मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार'; Time traveller चा खळबळजनक दावा

'Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार'; Time traveller चा खळबळजनक दावा

या महिन्यात दोन दिवसांत मोठी घडामोड घडणार आहे, त्यापैकी एक ख्रिसमसदिनी होणार असल्याचा दावा टाइम ट्रॅव्हलरने केला आहे.

या महिन्यात दोन दिवसांत मोठी घडामोड घडणार आहे, त्यापैकी एक ख्रिसमसदिनी होणार असल्याचा दावा टाइम ट्रॅव्हलरने केला आहे.

या महिन्यात दोन दिवसांत मोठी घडामोड घडणार आहे, त्यापैकी एक ख्रिसमसदिनी होणार असल्याचा दावा टाइम ट्रॅव्हलरने केला आहे.

 मुंबई, 06 डिसेंबर : आता कुठे कोरोनातून (Coronavirus) थोडाफार मोकळा श्वास मिळत असताना आता ओमिक्रॉनने (Omicron) पुन्हा चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटबाबत (Corona new variant) नवनवीन माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता पुढे आणखी काय काय वाढून ठेवलं आहे? अशी चिंता प्रत्येकालाच वाटतं आहे. आता एका टाइम ट्रॅव्हलरने (Time Traveller) अशाच एका दाव्याने सर्वांची चिंता वाढवली आहे. ख्रिसमसदिवशीच अशी काही मोठी घटना घडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण जग हादरेल असा धक्कादायक दावा या टाइम ट्रॅव्हरने केली आहे.

जगात असे काही लोक आहेत, जे टाइम ट्रॅवल (Time Travel) केल्याचा म्हणजे भविष्यातून परत आल्याचा दावा करतात. त्यांच्याकडे त्याबाबत काही पुरावा नसतो, त्यामुळे त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. पण सध्या परिस्थिती अशी आहे की, प्रत्येकाला भविष्यात काय होणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणणाऱ्या या व्यक्तीने नुकतीच एक भविष्यवाणी केली आहे.

हे वाचा - पुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स? 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा

या टाइम ट्रॅव्हरने सांगितल्यानुसार  या महिन्यात अशा दोन घटना घडणार आहेत ज्यामुळे संपूर्ण जग हादरणार आहे. त्याने दोन तारखाही जाहीर केल्या आहेत. टिकटॉकवर पोस्ट करत त्याने म्हटलं आहे. 20 डिसेंबरला 8 माणसांना सूर्याकडून सुपरपॉवर मिळणार आहे. तसंच 25 डिसेंबरला ख्रिसमसलाही एक मोठी घटना घडणार असल्याचं त्याने नमूद केलं आहे. ख्रिसमसच्या दिवशी असं काही मोठं होणार आहे ज्यामुळे संपूर्ण जग हैराण होईल. मानवी आयुष्य कायमचं बदलले. जगभरात या घटना कायम लक्षात राहतील. सोबतच मी टाइम ट्रॅव्हलर आहे हेसुद्धा सिद्ध होईल. त्यामुळे या दोन तारखा कधीच विसरू नका, असं त्याने सांगितलं आहे.

हे वाचा - दैनंदिन वापरातील या गोष्टीमुळे होणार जगाचा अंत? या व्यक्तीनं केला भविष्यातून परतल्याचा दावा

सोशल मीडियावर असे बरेच खळबळजनक दावे केले जात असतात. त्यांना कोणत्याही पुराव्यांचा आधार नसतो. या भविष्यावाणीबाबतही काही पुरावे नाही. त्यामुळे ही भविष्यवाणी किती खरे ठरेल हे येणाऱ्या कालावधीतच समजेल.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, World news