जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फाटकी जीन्स घालून मुलगी पोहोचली शाळेत, पुढे शिक्षिकेनं जे केलं ते आश्चर्यकारक

फाटकी जीन्स घालून मुलगी पोहोचली शाळेत, पुढे शिक्षिकेनं जे केलं ते आश्चर्यकारक

व्हायरल

व्हायरल

आजकाल कॉलेजमध्ये जाताना मुलं मुली निरनिराळे रंगीबेरंगी कपडे घालून जातात. मात्र बऱ्याचदा कपड्यांवरुन त्यांना शिक्षकांचा ओरडा खावा लागतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी :  आजकाल कॉलेजमध्ये जाताना मुलं मुली निरनिराळे रंगीबेरंगी कपडे घालून जातात. मात्र बऱ्याचदा कपड्यांवरुन त्यांना शिक्षकांचा ओरडा खावा लागतो. अशी प्रकरणे घरापर्यंतही जाताना दिसून येतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. एक मुलगी रिप्ड जीन्स घालून शाळेत पोहोचली पुढे शिक्षकांनी जे केलं ते पाहून मुलीच्या आईने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेत राहणारी एक मुलगी रिप्ड जीन्स घालून शाळेत पोहोचली. शाळेतील शिक्षकाने तिच्या रिप्ड जीन्सवर सेलोटेप चिकटवला. शिक्षकाच्या या वागण्यावर मुलीची आई संतापली आणि तिनं याविषयी टिकटॉकवर व्हिडीओ शेअर केला आहे.

News18

व्हिडीओ शेअर करत मुलीची आई म्हणाली, शाळेतील शिक्षिकेच्या कार्यालयात माझ्या मुलीच्या त्वचेवर टेप लावला, हे वागणं योग्य आहे का? डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, व्हिडीओमध्ये मुलीच्या आईने शाळा प्रशासनाला फटकारलं आहे. आपल्या मुलीचा अपमान झाल्याचं तिनं म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मुलीच्या आईने आणखी एक व्हिडीओ बनवत शाळेच्या पॉलिसीविषयीदेखील सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये महिला म्हणतेय की, पॉलिसीनुसार, समुदाय मानकांचे पालन करणारा ड्रेस स्वच्छ असावा. विद्यार्थ्यांनी अंगावरचे अवयव किंवा अंतर्वस्त्रे दिसतील असे कपडे घालू नये. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. अनेकजण मुलीला पाठिंबा देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात