• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • I LOVE YOU म्हणत चक्क भल्यामोठ्या सापालाच KISS देत राहिली आणि...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

I LOVE YOU म्हणत चक्क भल्यामोठ्या सापालाच KISS देत राहिली आणि...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

महिलेचं सापावरच प्रेम जडलं आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : सापाला (Snake Video)  पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो.  त्याच्या जवळ जाणं तर दूरच राहिलं. पण या तरुणीची डेअरिंग तर पाहा, तिने चक्क आपल्या हातातच साप धरला आहे. इतकंच नाही तर तिने सापाला किससुद्धा दिलं आहे (Girl Kissed Snake). हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल  (Viral Video) होतो आहे. किती तरी जण साधा गांडूळ पाहिला तरी घाबरतात. पण ही तरुणी तर एखादं खेळणंच असावं असा खराखुरा साप हातात घेऊन दिसते. फक्त तिने सापाला हातात धरलं नाही तर ती त्याला आय लव्ह यू असं म्हणत त्याला किसही करते आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अंगावर काटाही येईल.
  व्हिडीओत पाहू शकता महिलेने एका सापाला हातात धरलं आहे. का साप तिच्या चेहऱ्यावर चिकटून बसला आहे. महिला त्याला अगदी कवटाळून आय लव्ह यू म्हणते आणि किसही करते. तेव्हा साप आपलं तोंड उघडतो. थोड्या वेळाने महिला त्याला पुन्हा किस करते. त्यावेळी साप तिच्या चेहऱ्यावरून फिरतो. यानंतर महिला भीतीसारखी प्रतिक्रिया देते. पण खरंतर ती या सापाला बिलकुल घाबरत नाही आहे. सापही तिला काहीच करत नाही. हे वाचा - महाकाय अजगराने महिलेच्या मानेभोवती घातला विळखा आणि...; थरकाप उडवणारा VIDEO royal_pythons_  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मी माझ्या सापावर खूप प्रेम करते, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. हा साप आहे, दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि तो ते करणारच. अशा दीवांची असा खेळ खेळणं योग्य नव्हे, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर एका युझरने मात्र हे अद्भुत दृश्य आहे. यालाच खरं प्रेम म्हणतात असं म्हटलं आहे. हे वाचा - VIDEO - काठीऐवजी तरुणीने हातानेच पकडला भलामोठा साप; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप याआधीही एका तरुणीचा असाच सापाला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्नेक्स मॅनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. व्हिडीओत पाहू शकता, हिरव्या रंगाचा हा साप आकाराने बारीक पण लांब आहे. असं असलं तरी तो शेवटी सापच आहे ना. तरुणीने आपल्या बोटांभोवती   (Green Snake) त्याला गुंडाळलं आहे. हा साप म्हणजे तिच्या बोटातील अंगठीच वाटत आहे. सुरुवातीला तो खोटा असल्याचंही दिसतं पण पुढे त्याची हालचाल होताना दिसते.
  View this post on Instagram

  A post shared by Snakes Mania (@snakes.mania)

  सापही तिच्या चेहऱ्यावर फिरतो. तिच्या डोळ्यांवर हळुवारपणे स्पर्श करताना दिसतो. पण तरुणीच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही आहे. सापासोबत ती कम्फर्टेबल आहे. दोघंही एकमेकांसोबत मस्ती करतानाही दिसत आहे. व्हिडीओच्या आणखी पुढे गेल्यावर तर धक्काच बसतो. तरुणी सापाला आपल्यासमोर धरते आणि हळूच त्याला आपल्या ओठांजवळ नेते आणि त्याच्या तोंडावर किस करते.
  Published by:Priya Lad
  First published: