जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ऐकावं ते नवल! खरं प्रेम शोधण्यासाठी मुलीने लढवली शक्कल; केलं असं काही बसणार नाही विश्वास

ऐकावं ते नवल! खरं प्रेम शोधण्यासाठी मुलीने लढवली शक्कल; केलं असं काही बसणार नाही विश्वास

व्हायरल

व्हायरल

प्रेमाविषयी आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. प्रेमाविषयीची अनेक उदाहरणे, अनेक घटना समोर येत असतात. प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी तर एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 जानेवारी : प्रेमाविषयी आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. प्रेमाविषयीची अनेक उदाहरणे, अनेक घटना समोर येत असतात. प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी तर एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. मात्र काहींच्या नशीबत हे प्रेम नसतं किंवा उशीरा येतं. आपलं खरं प्रेम मिळण्यासाठीही लोकांना बराच संघर्ष करावा लागतो. याशिवाय अनेक डेटिंगचे किस्सेही समोर येत असतात. सोशल मीडियावर तर अशा गोष्टी खूप लवकर व्हायरल होताना दिसतात. सध्या एका मुलीच्या डेटिंग लाईफची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एका मुलीने दावा केला आहे की ती आठवड्यातून 6 वेळा डेटवर जाते. ती आपल्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय याविषयी जाणून घेऊया. Vivian Tu, व्यवसायाने व्यापारी आहे आणि Tiktok वर @YourRichBFF या युजरनेमने लोकप्रिय आहे. टिकटॉकवर तिचे 23 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विवियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती एका आठवड्यात 6 वेळा डेटवर गेल्याचे सांगत होती. विवियनने अलीकडेच एलिट डेलीला दिलेल्या मुलाखतीत या व्हायरल व्हिडिओबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. हेही वाचा -  रुसलेल्या बॉयफ्रेंडसाठी मुलीनं लिहिलं हटके लव्ह लेटर, हसून हसून व्हाल लोटपोट विवियनने मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिनं हा व्हिडीओ मजेशीर पद्धतीने बनवला होता. विवियनने सांगितले की, ती केवळ जेवणासाठी डेटवर गेली नव्हती. मात्र, डेटिंगदरम्यान खूप आर्थिक मदत मिळाल्याचे तिने निश्चितपणे कबूल केले. डेटिंगवर गेल्यानंतर तिला असं जाणवलं की, ती 4 ते 5 हजार रुपये वाचवत होती. या पैशातून तिने एक बॅग खरेदी केली. विवियनने जेव्हा न्यूयॉर्कमध्ये राहण्यास सुरुवात केली तेव्हा ती डेटिंग अॅपवर होती. विवियनने एलिट डेलीला सांगितले की, ती वर्षाला सुमारे 80 लाख रुपये कमवत होती. तिच्या मते, मोफत जेवणासाठी डेटवर जाणे ही चांगली कल्पना नाही. त्यावेळी ती ‘खरे प्रेम’ शोधण्यासाठी डेटवर जात होती.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, प्रेम, डेटिंग याविषयी अनेक घटना समोर येत असतात. विवियनच्या पहिलेही अनेक वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. सध्या विवियन तिच्या या डेटिंगमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात