Home /News /viral /

अनोळखी व्यक्तीसोबत डेटसाठी गेली तरुणी; ड्रेस पाहताच तरुणाने केलं असं काही की वाचून व्हाल शॉक

अनोळखी व्यक्तीसोबत डेटसाठी गेली तरुणी; ड्रेस पाहताच तरुणाने केलं असं काही की वाचून व्हाल शॉक

निक्की जॅब्स (Nikki Jabs) हिने नुकतंच सोशल मीडियावर आपली डेटिंग स्टोरी शेअर केली आहे, जी वाचून तुम्हीही हैराण व्हाल

    नवी दिल्ली 23 नोव्हेंबर : जेव्हा दोन अनोळखी लोक डेटवर जातात तेव्हा दोघंही अशा पद्धतीने तयार होण्याचा प्रयत्न करतात की ते समोरच्याला आवडावं. आजकाल डेट कल्चर अतिशय वेगाने वाढत आहे. टिंडरसारख्या अॅप्सच्या माध्यमातून लोक नवनवीन लोकांना भेटतात आणि त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालण्यासाठी प्लॅन करतात. मात्र अनेकदा असं काही घडतं की संपूर्ण डेटचा प्लॅनच खराब होतो (Bad Dating Experience). असंच काहीसं एका तरुणीसोबत घडलं, जेव्हा ती अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली होती (Man Doesn’t Like Girlfriend’s Dress on Date). मात्र या तरुणाला तिचा ड्रेस आवडला नाही. अमेरिकेची रहिवासी असलेल्यी निक्की जॅब्स (Nikki Jabs) हिने नुकतंच सोशल मीडियावर आपली डेटिंग स्टोरी शेअर केली आहे, जी वाचून तुम्हीही हैराण व्हाल. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, निक्कीने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती ढसाढसा रडताना दिसते. या व्हिडिओच्या माध्यमातून निक्कीने आपला डेटिंगबाबतचा विचित्र अनुभव शेअर केला आहे. 30 वर्षीय निक्कीने व्हिडिओमध्ये सांगितलं, की ती एका व्यक्तीला भेटण्यासाठी निघाली होती. मात्र भेटण्याची जागा ऑफिससोबत जोडलेली होती. निक्की त्या व्यक्तीला एका ऑफिस ईव्हेंटमध्ये भेटायला निघाली होती, जिथे त्याच्या ऑफिसमधील इतर लोकही असणार होते. यामुळे तिने तयार होण्यासाठी 40 मिनिट घेतले आणि व्यवस्थित तयार होऊन ईव्हेंटमध्ये गेली. मात्र, तिला पाहताच हा व्यक्ती हैराण झाला कारण ती ईव्हेंटच्या मानाने जास्तच ड्रेसअप होऊन गेली होती. या व्यक्तीने निक्कीला म्हटलं की तुला पाहून मला लाज वाटत आहे. यामुळे त्याने लगेचच कॅब बुक केली आणि निक्कीला परत घरी पाठवलं. महिलेनं हा अनुभव सांगत आपला व्हिडिओ शेअर केला असून यात ती रडताना दिसते. या घटनेनंतर निक्कीनं त्या मुलासोबत बोलणंही बंद केलं. तिनं म्हटलं, मला या गोष्टीचं जास्त दुःख झालं की त्याच्यासाठी मी इतकं तयार झाले पण त्याने माझाच अपमान केला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Online dating, Shocking news

    पुढील बातम्या