बॉयफ्रेंडवर असणाऱ्या प्रेमापोटी तरुणीनं त्याच्या (Girl gets tattoo of boyfriend name on her back but breaks up with him in a week) नावाचा टॅटू पूर्ण पाठीवर गोंदवून घेतला खरा, पण आठच दिवसांत त्यांचा ब्रेकअप झाला. या घटनेमुळे हसावं की रडावं (What to do with the tattoo) हे तरुणीला समजेनासं झालं आहे. मोठ्या हौसेनं काढून घेतलेल्या या टॅटूच्या वेदना कमी होण्यापूर्वीच ब्रेकअपच्या वेदनांना तिला सामोरं जावं लागलं. आता मी काय करू, असा सवाल करत तिने एक व्हिडिओ टिकटॉकवर (Video shared on Tiktok) शेअर केला आहे.
टॅटू काढल्यावर झाला ब्रेकअप
ऍश्निल ग्रेस नावाच्या या तरुणीनं तिच्या टिकटॉक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने आपल्या टॅटूची कैफियत मांडली आहे. ऍश्निल प्रेमात इतकी वेडी झाली होती की आपल्या बॉयफ्रेंडसाठी काय करू अन् काय नको, असं तिला होऊन गेलं होतं. त्यासाठी तिने स्वतःच्या शरीरावर बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला. मात्र त्यानंतरच्या सात दिवसांत अशा काही घटना घडल्या, की त्यामुळे दोघांचा ब्रेकअप झाला.
ऍश्निलला पडला प्रश्न
ब्रेकअप झाल्याचं दुःख तर आहेच, मात्र ऍश्निलला सतावणारा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आपल्या पाठीवरच्या टॅटूचं काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर मिळत नसल्यामुळं तिने हा प्रश्न टिकटॉकवरून तिच्या फॅन्सला विचारला आहे. फॅन्सनीदेखील तिच्या या प्रश्नावर कमालीची उत्तरं दिली आहे.
हे वाचा- पूर्ण झोप न घेणाऱ्यांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक; महिलांवर सर्वाधिक परिणाम
फॅन्सची अजब उत्तरं
टॅटूचं काय करायचं, यावर एश्निलच्या फोलोअर्सनी तिला तऱ्हेतऱ्हेची उत्तरं दिली आहेत. आता तू ज्या नावाचा टॅटू गोंदवला आहेस, त्याच नावाचा दुसरा बॉयफ्रेंड शोध, असं उत्तर एकानं दिलं आहे, तर हा टॅटू काढणाऱ्या कलाकाराला शिक्षा करायला हवी, अशी मजेशीर प्रतिक्रिया दुसऱ्याने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girlfriend, Tattoo, Tiktok