मुंबई, 27 सप्टेंबर: गेल्या काही काळापासून महागाई वेगानं वाढत आहे. इंधन, अन्नधान्य, तेल आणि गॅसच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मिळणारं उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ पुरता बिघडला आहे. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी अनेक जण उत्पन्नाचे नवनवीन स्रोत सातत्याने शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. ही महिला कोणतीही पूर्ण वेळ नोकरी करत नसतानाही महिन्याला सुमारे 24 लाख रुपये मिळवते. यासाठी ती विविध स्रोतांचा वापर करते. तुम्ही उत्पन्नाच्या स्रोतांचा शोध घेत असाल, तर ही महिला वापरत असलेले काही स्रोत तुम्ही वापरायला काहीच हरकत नाही. भारतासह जगभरातल्या काही देशांना महागाईच्या झळा बसत आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिकांना रोजच्या खर्चात कपात करावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधत आहेत. नवे स्रोत शोधत असताना बऱ्याच जणांना कुठून सुरुवात करायची असा प्रश्न पडतो; पण एका महिलेनं याबाबत स्वतः केलेल्या प्रयोगांची सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही महिला कुठेही पूर्ण वेळ नोकरी करत नाही, तरीदेखील दरमहा 24 लाख रुपये कमावते. sara Finance या नावाने यू-ट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या या महिलेनं उत्पन्नाचे नवीन पाच मार्ग सांगितले आहेत. साराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘पॅसिव्ह इन्कम : मी एका महिन्याला किमान 24 लाख रुपये कसे कमावते (पाच मार्ग)’ असं त्या व्हिडिओचं शीर्षक आहे. साराच्या या टिप्सचा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओसाठी नेटिझन्स साराचं कौतुक करत असून तिचे आभार मानत आहेत. यावर एका युझरने लिहिलं आहे, की `हे ज्ञान आणि माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.` आणखी एका नेटिझनने `हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहे’, असं म्हटलं आहे. हेही वाचा - Shocking! School Bus च्या दरवाजात अडकली चिमुकली, ड्रायव्हरने फरफटत नेलं; लक्ष गेलं तोपर्यंत… उत्पन्नाचा एक स्रोत म्हणून सारा लवकरच तिची जुनी कार भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात करणार आहे. ती म्हणाली, ‘अनेक जण आपली कार भाडेतत्त्वावर देतात. मी असं केलं तर दरमहा 15 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकेन, असं मला वाटतं’. सारानं तिच्या उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण स्रोत डिव्हिडंड्स असल्याचं नमूद केलं. ती म्हणाली, ‘मी डिव्हिडंड्सच्या माध्यमातून दरमहा सुमारे 64 हजार रुपये कमावते. काही खास स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला डिव्हिडंड पेमेंट मिळू शकतं’. यू-ट्यूब हादेखील सारासाठी महत्त्वाचा कमाईचा स्रोत आहे. ‘मी ठराविक कालावधीनंतर व्हिडिओ बनवते, तरीदेखील मी यू-ट्यूबच्या माध्यमातून चांगली कमाई करते. यू-ट्यूबवर फायनान्सशी निगडित विषयांवर व्हिडिओ करणाऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं’, असं साराने सांगितलं. अफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून साराला चांगले पैसे मिळतात. ‘जेव्हा तुम्ही इतरांची उत्पादनं विकता तेव्हा तुमच्या लिंकद्वारे कोणी ती उत्पादनं विकत घेतली तर तुम्हाला त्यासाठी थोडं कमिशन मिळतं. मी अफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून दरमहा सुमारे आठ लाख रुपये कमावते’, असं सारानं सांगितलं.
ड्रॉप शिपिंग बिझनेसच्या माध्यमातूनही साराला चांगला फायदा होतो. ‘ड्रॉप शिपिंग बिझनेसमुळे मी जॉब सोडू शकले. गेल्या महिन्यात ड्रॉपशिपिंग बिझनेसमध्ये मी सुमारे 40 लाख रुपयांचा सेल केला. त्यातून मला 14 लाख रुपये नफा मिळाला. ड्रॉप शिपिंग ही अशी जागा आहे, जिथं तुम्ही shopify app च्या माध्यमातून एक ऑनलाइन स्टोअर क्रिएट करू शकता. या स्टोअरमध्ये तुम्ही AliExpress चा वापर करून प्रॉडक्ट सादर करू शकता. इथं तुम्ही प्रॉडक्टची किंमत वाढवू शकता. त्यानंतर जेव्हा ग्राहक तुमच्याकडून एखादं प्रॉडक्ट खरेदी करतो तेव्हा तुम्ही त्या वस्तू थेट ग्राहकापर्यंत पोहोचवून नफा तुमच्याजवळ ठेवू शकता’, असं सारानं सांगितलं. साराच्या या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यू-ट्यूबवर साराचे सुमारे 3 लाख 80 हजार सबस्क्रायबर्स आहेत.