नवी दिल्ली, 01 मे : कोरोना महामारीमध्ये सर्वच ठप्प झालं होतं. लोकांना बाहेर पडणंही कठिण झालं होतं मग कामावर जाण्याची गोष्ट तर दूरचीच. त्यामुळे वाढता संसर्ग पाहून कोरोना काळात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम लागू केलं होतं. आजही अनेकजण घरुनच काम करतात. मात्र घरून काम करताना अनेक कर्मचारी चांगलं काम करतायेत तर काही टाईमपास करत काम करतायेत. वर्क फ्रॉम होमच्या अनेक विचित्र घटना समोर येत असतात. नुकतीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये एका वर्क फ्रॉम करणाऱ्या तरुणीला कामावरुन काढलं आणि त्याचं कारण ऐकून तुम्हीही चक्क व्हाल. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तरुणी ब्रिटनमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होती. हे प्रकरण थोडे जुने असले तरी नुकतेच ते पुन्हा चर्चेत आलं आहे. ती आपल्या कामात चोरी करायची आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण करत नाही, असा आरोप या तरुणीवर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काम करताना तिला झोप येते, असा आरोपही करण्यात आला. तरुणीने हा आरोप चुकीचा सांगितला होता. मात्र कंपनीने तिची पोलखोल केली. मुलीच्या लॅपटॉपमध्ये एक सॉफ्टवेअर होते, ज्याबद्दल मुलीला कदाचित माहित नव्हते. एक दिवस काम करत असताना ती मुलगी अचानक लॅपटॉपसमोर झोपली. इतकंच नाही तर तिने कामाव्यतिरिक्त इतरही अनेक कामे केली, ज्याचा कंपनीच्या कामाशी काहीही संबंध नव्हता. तरुणीची ही सर्व कृती लॅपटॉपमध्ये कैद झाली. सॉफ्टवेअरने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ कंपनीला पाठवला. यानंतर कंपनीला मेल आला आणि हे सर्व व्हिडीओ मेलमध्ये पाठवण्यात आले. हे पाहून मुलगीही थक्क झाली. हेही वाचा - Viral Video : डोंगराळ रस्ता पार करताना गाडी खाली कोसळली अन्… भयानक घटना कॅमेऱ्यात कैद कोरोनाच्या काळात आणि लॉकडाऊनच्या काळात घरून काम करण्याच्या सुविधेमुळे केवळ कर्मचाऱ्यांनाच मोठा दिलासा मिळाला नाही तर घरून काम केल्यामुळे सर्व कंपन्या आपले लक्ष्यही सहज पूर्ण करत आहेत. मात्र, आता हळूहळू सर्वच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे.