जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! 'पतली कमरिया'वर ठुमके तरुणीला पडले भारी; काय घडलं पाहा Shocking Video

बापरे! 'पतली कमरिया'वर ठुमके तरुणीला पडले भारी; काय घडलं पाहा Shocking Video

'पतली कमरिया' डान्स तरुणीला भारी पडला.

'पतली कमरिया' डान्स तरुणीला भारी पडला.

पतली कमरियावर डान्स करणाऱ्या तरुणीसोबत घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

    मुंबई, 11 फेब्रुवारी : ‘पतली कमरिया’ डान्स ने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या दुनियेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर हजारो-लाखोंच्या रिल्स तयार झाल्या. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पतली कमरियावर डान्स करणं या तरुणीला चांगलंच भारी पडलं आहे. या गाण्यावर डान्स करताना, ठुमके लगावताना तिच्यासोबत भयंकर घडलं आहे. ही तरुणी एका टेम्पोवर उभी राहून पतली कमरियावर डान्स करत होती. तिच्यासमोर बरेच लोक उभे होते, तिचा डान्स पाहत होते. पण त्यावेळी तिच्यासोबत जे काही घडलं त्याचा विचार कुणीच गेला नव्हता. यापुढे पतली कमरिया काय कदाचित कोणत्याच गाण्यावर डान्स करण्याची हिंमत कदाचित तिची होणार नाही. असं या तरुणीसोबत झालं तरी काय? हे वाचा -  लय भारी राव! पोरांनी घातला जबरदस्त ‘पिंगा’; दीपिका-प्रियांकाही यासमोर वाटतील फेल; पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता तरुणी एका टेम्पोवर आहे. तिच्या मागे एक व्यक्ती आहे, जिने पतली कमरिया हे गाणं लावलं आहे. या गाण्यावर तरुणी नाचू लागते. ठुमके लगावते. पण काही वेळात तिच्यासोबत जे घडतं ते काळजाचं ठोका चुकवणार आहे. जशी तरुणी कंबर हलवून ठुमके लगावते तसा तिचा एक पाय ट्रकच्या बाहेर जातो आणि ट्रकवरून धाडकन खाली कोसळते. ती इतक्या जोरात पडते की तिची कंबर नक्कीच मोडली असावी. पतली कमरियावर ठुमके लगावण्याच्या नादात ही तरुणी आपली कंबर मोडून घेते. तिथं उपस्थित सर्व लोकही हैराण होऊन पाहत राहतात. हे वाचा -  Video : फोटोची भारी हौस; फोटो काढायला गेली अन्.., महिलेसोबत जे घडलं ते पाहून हासू आवरणार नाही patiale_wale_chacha_ji नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘टूट गई कमरिया हाय हाय हाय’, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

    जाहिरात

    तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं किंवा या गाण्यावर डान्सबाबतचे तुमच्याकडेही असे काही किस्से असतील तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा आणि हो तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कुणी व्यक्ती पतली कमरियावर डान्स करणार असेल तर नक्की काळजी घ्या. तरुणीसोबत जे घडलं ते तुमच्यासोबत घडू देऊ नका.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात