मराठी बातम्या /बातम्या /Viral /लय भारी राव! पोरांनी घातला जबरदस्त 'पिंगा'; दीपिका-प्रियांकाही यासमोर वाटतील फेल; पाहा VIDEO

लय भारी राव! पोरांनी घातला जबरदस्त 'पिंगा'; दीपिका-प्रियांकाही यासमोर वाटतील फेल; पाहा VIDEO

दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्राच्या पिंगा गाण्यावर मुलांनी जबरदस्त डान्स केला आहे.

दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्राच्या पिंगा गाण्यावर मुलांनी जबरदस्त डान्स केला आहे.

दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्राच्या पिंगा गाण्यावर मुलांनी जबरदस्त डान्स केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 05 फेब्रुवारी : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या बाजीराव मस्तानी फिल्ममधील पिंगा गाणं सर्वांच्या चांगल्याच पसंतीस पडलं. या गाण्याने आणि दीपिका-प्रियांकाच्या गाण्याने सर्वांना वेड लावलं. आता याच गाण्यावर पोरांनी पिंगा घातला आहे. दीपिका-प्रियांकाच्या पिंगा गाण्यावर मुलं थिरकली आहेत. त्यांचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

महिलांना पिंगा घालताना तुम्ही पाहिलं असेल. दीपिका-प्रियांकाच्या गाण्यावरही बऱ्याच महिलांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण हाच पिंगा मुलांनी घातला तर... काही मुलांनी हा प्रयत्न केला आणि त्यांनी जबरदस्त पिंगा करून दाखवला. या पिंगाला त्यांनी हटके ट्विस्ट दिला आणि हटके स्टेप्ससह तो सादर केला.

हे वाचा - Most Difficult Dance Video - म्हणे, 'हा जगातील सर्वात कठीण डान्स'; ट्राय करून तुम्हाला जमतोय का सांगा

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका सुंदर बॅकग्राऊंडसमोर हे तीन तरुण उभे आहेत. मागून पिंगा गाणं वाजतं आणि मग तिघंही आपला जलवा दाखवू लागतात. गाण्यावर जबरदस्त थिरकतात. गाण्यावर ताल धरत एकदम भारी डान्स करतात.

कलाकार आणि इन्स्टाग्राम युझर मोहित यादवने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये पिंगा गं पोरी, असं गाण्याचं नाव लिहिलं आहे. मुलांचा हा पिंगा बऱ्याच जणांना आवडला आहे.  या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. शानदार, कमाल अशी प्रतिक्रिया युझर्सनी दिली आहे

View this post on Instagram

A post shared by Mohit Yadav (@m_mohit_yadav)

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Dance video, Viral, Viral videos