ब्राझिल, 21 फेब्रुवारी : काहींना उंचीची भीती असते तर अनेक जणांना पाण्याची भीती असते. मात्र खूप पर्यटक या सगळ्या प्रकारच्या भीती आपल्या बॅगपॅकमध्ये बांधून दुनिया हिंडत असतात. साहसांनी भरलेलं आयुष्य जगत असतात. अशाच एका साहसी आणि अति उत्साही पर्यटकाचा ब्राझिलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही क्षणांसाठी हृदयाचे ठोके थांबल्याचं तुम्हाला वाटेल. कारणही तसंच आहे. ब्राझिलमधील पेरा दा गाविया (PEDRA DA GAVEA) या ठिकाणचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये एक पर्यटक 2 हजार 769 फुट उंचावर असणाऱ्या पहाडावर बसून आपलं फोटोशूट करत आहे. यामध्ये ती अत्यंत आनंदामध्ये व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. मात्र व्हिडीओ पाहणाऱ्याच्या हृदयाचे ठोके चुकतात. कारण ज्याठिकाणी बसून ती व्हिडीओ शूट करत आहे, त्याठिकाणी अगदी तिच्या मागेच निळाशार समुद्र आहे. त्यामुळे या मुलीची स्टंटबाजी थोडीशी जरी चुकली असती तरी अनर्थ झाला असता.
15 सेकंदाच्या या व्हिडीओवर लाखो युजर्सनी कमेंट केली आहे. अनेकांनी त्यावर memes देखील बनवले आहेत. हा असा स्टंट करणं अशक्यच आहे अशा प्रतिक्रिया देखील अनेक युजर्सनी दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर @influencersinthewild या प्रसिद्ध युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. @influencersinthewild ने या व्हिडीओला दिलेली कॅप्शन देखील खूप भन्नाट आहे. अनेकांनी या व्हिडीओमधील मुलीच्या स्टंटबाजीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटलं आहे ‘हे म्हणजे इन्शुरन्सच्या पैशांसाठी बायकोचा खून कसा करावा’, तर आणखी एक युजर म्हणतोय की ‘माझ्या पायातील त्राण निघून गेले आहेत, अजिबात आवडलेलं नाही’.
Her life insurance company: pic.twitter.com/g8Zo2AE43g
— 𝓢𝓱𝓸𝔀 𝓶𝓮 𝔀𝓱𝓪𝓽 𝔂𝓸𝓾'𝓻𝓮 𝓶𝓪𝓭𝓮 𝓸𝓯 (@HoodieGenji) February 16, 2020
My palms got sweaty just watching her inch down
— Paul (@MBAYoungBoy) February 16, 2020
टुरिझम वेबसाईट विझीट ब्राझिलच्या मते PEDRA DA GAVEA जगातील सर्वात मोठा समुद्री तट आहे. 3 तासांच्या ट्रेकिंगनंतर तुम्ही याठिकाणी सर्वात उंचावर पोहचू शकतात. मात्र तुम्ही ट्रॅव्हलर किंवा ट्रेकर असाल, तरी सुद्धा अशाप्रकारचा स्टंट करणं अत्यंत घातक आहे.

)







