Home /News /viral /

शेवटी पोटाचा प्रश्न आहे! गवत खाण्यासाठी जिराफाचा जुगाड, 90 लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला VIDEO

शेवटी पोटाचा प्रश्न आहे! गवत खाण्यासाठी जिराफाचा जुगाड, 90 लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला VIDEO

तुम्ही कधी जिराफला गवत खाताना, भांडण करताना किंवा झोपताना पाहिलंय का? हा VIDEO पाहा

    जिराफाची (Giraffe) मान इतकी मोठी असते की तो मोठ्यातला मोठ्या फांद्यांपर्यंत तो सहज पोहोचू शकतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की जिराफ जमिनीवरील गवत कसा खात असेल? सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये जिराफ जमिनीवर गवत घाण्यासाठी किती (Giraffe Eats Grass) प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पोट धरून हसत आहेत. हा व्हिडीओ ट्विटर यूजर '@ डॅनीडच' द्वारा ऑनलाइन शेअर करण्यात आला होता आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने व्हायरल झाला होता. त्यांनी व्हिडीओ शेअर करीत लिहिलं आहे की, जिराफ कसं गवत खात असेल याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता. मात्र हे खूप रंजक आहे. जिराफ आपल्या पुढील दोन पाय दुमडून अर्धवट खाली बसतो आणि गवत खातो..त्यानंतर उडी मारुन दोन्ही दुमडलेले पाय सरळ करतो. तो त्याची मानही वेगळ्याच पद्धतीने दुमडतो..हे पाहणे खूप मजेशीर आहे. पाहून तुम्हालाही मजा येईल. हे ही वाचा-छेड काढणाऱ्याला महिलेनं शिकवली चांगलीच अद्दल; झाडाला बांधलं आणि... VIDEO VIRAL हा व्हिडीओ 12 ऑक्टोबर रोजी शेअर केला होता, आतापर्यंत या व्हिडीओला 9.7 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच 2 लाखांहून जास्त लाइक्स आणि 53 हजारांहून जास्त लोकांनी प्रतिक्रिया दिली आहेत. हा संपूर्ण संवाद जिराफांचे चित्र, व्हिडीओ आणि GIF ने भरलेला आहे. फोटोंमध्ये तूम्ही पाहू शकतो की जिराफ कशाप्रकारे दैनंदिन कामं करतो. जिराफ हा जंगलातील सर्वात उंच प्राणी आहे आणि हा प्राणी आफ्रिकेत सर्वाधिक आढळतो. जिराफ आपली उंच मान आणि उंच पायांसाठी ओळखला जातो. नॅशन जिओग्राफीनुसार त्यांचं उंच असणं काही प्रमाणात नुकसानकारकही आहे. जिराफला पाणी पिणंही त्रासदायक असतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या