नवी दिल्ली, 30 मार्च : अंतराळात प्रत्येक सेकंदात काही ना काही क्रिया घडत राहते. त्यातील काही निदर्शनासही येत नाहीत. परंतु अशा काही घटना घडतात, ज्याचा थेट परिणाम पृथ्वीवर होऊ शकतो. कृष्णविवरापासून ते ओझोन थर कमी होण्यापर्यंत अशी काही उदाहरणे आहेत. त्यांच्याद्वारे पृथ्वीलाही हानी पोहोचते. अलीकडेच, तज्ज्ञांना सूर्यामध्ये भगदाड पडल्याचं दिसून आलं आहे.
सूर्यावर पृथ्वीपेक्षा मोठं छिद्र पडलं आहे. या छिद्राचा आकार पृथ्वीपेक्षा वीसपट मोठा आहे. म्हणजे या होलमध्ये पृथ्वीसारखे 20 ग्रह मावतील इतकं ते मोठं आहे. सूर्यावर पडणाऱ्या या छिद्राला कोरोनल होल म्हटलं जातं. आतापर्यंत तज्ज्ञांना सूर्यावर अशी दोन छिद्रं सापडली आहेत.
सूर्यावरील ही दोन्ही छिद्रे नासाच्या सोलर डायनॅमिक वेधशाळेला सापडली आहेत. त्यांचे काम सूर्याचा अभ्यास करणं आहे. ते ध्रुवाजवळ आहेत आणि येथून सूर्याच्या बहुतेक क्रियाकलापांचा शोध घेतला जातो. ज्या ठिकाणी ही छिद्रे आढळतात, तिथले तापमान थोडं कमी असतं. पण दुसरे छिद्र सूर्याच्या विषुववृत्तात आहे.
पृथ्वीवर उभं राहून पृथ्वीला फिरताना कधी पाहिलंय; पाहा अद्भुत VIDEO
याआधी सूर्यावर दिसलेलं एक छिद्र पृथ्वीपेक्षा तीस पट मोठं आहे. त्यामुळे अमेरिकेतील अॅरिझोना येथील रात्रीच्या आकाशात जांभळे आणि हिरवे दिवे दिसत होते. सोलर जी3 वादळ आलं. अनेक अवकाशयानाच्या कामांवर याचा परिणाम झाला. त्यानंतर आता दिसलेलं पृथ्वीच्या वीसपट आकाराचं हे सर्वात मोठं दुसरं छिद्र आहे.
यामुळे येत्या आठवड्यात पृथ्वीला मोठा फटका बसू शकतो. आठवड्याच्या अखेरीस या छिद्राचा पृथ्वीवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
माणसाच्या आकाराएवढं वटवाघुळ कधी पाहिलंय का? घराला लटकलेला Photo व्हायरल
या छिद्रातून 1.8 दशलक्ष मैल प्रतितास वेगाने वादळासारखे वारे बाहेर पडत आहेत. हे वारे लवकरच पृथ्वीला हानी पोहोचवू शकतात.तज्ज्ञांच्या मते, येत्या 24 तासांत हे वारे पृथ्वीवर पोहोचू शकतात. याचा परिणाम पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र, उपग्रह आणि तंत्रज्ञानावर होणार आहे. शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला तर येत्या 24 तासांत पृथ्वीच्या अनेक भागात वीज खंडित होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.