उदयपुर, 11 जुलै : राजस्थानमधील उदयपुरमध्ये (Udaipur) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका घरात उंदीर पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. (Cage) मात्र त्यात उंदराऐवजी ब्लॅक कोब्रा (Black Cobra) अडकला. सकाळी कुटुंबाने पिंजरा पाहिला तर त्यांना धक्काच बसला. त्यानंतर तातडीने ब्लॅक कोब्राच्या रेस्क्यू टीमला बोलावण्यात आलं. रेस्क्यू टीमने पिंजरा कापून कोब्रा बाहेर काढला आणि जंगलात सोडून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना एकलिंगपुरा भागात घडली आहे**. (Cage kept in the house for rats)** या भागात राहणारे लक्ष्मण सिंह घरातील उंदरांमुळे त्रस्त झाले होते. शेवटी त्यांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा आणला. मात्र पिंजऱ्यात उंदराऐवजी कोब्रा अडकल्यामुळे संकट वाढलं आहे. लक्ष्मण यांनी रात्री घरात पिंजरा लावून त्याचं दार खुलं ठेवलं होतं. सकाळी पिंजऱ्याचं दार बंद होतं, मात्र त्यात फणा काढून कोब्रा महाशय बसले होते. हे पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर तातडीने वाइल्ड एनिमल रेस्क्यू टीमला बोलावण्यात आलं.
सापाचं अख्खं शरीर पिंजऱ्याच्या आत.. वाइल्ड एनिमल रेस्क्यू टीमने घटनास्थळी येऊन सापाला पिंजऱ्याच्या बाहेर काढलं. सापाचं अख्खं शरीर पिंजऱ्यात अडकलं होतं. त्यामुळे पिंजऱ्याला कापून सापाला बाहेर काढण्यात आलं आणि नंतर त्याला जंगलात सोडलं. पावसाळ्यात जंगलातील प्राणी आसरा शोधण्यासाठी वस्तींमध्ये येतात. पावसाळ्यात अजगर आणि साप घरांजवळ सापडण्याची शक्यता अधिक असते.