लखनऊ, 03 फेब्रुवारी : सोशल मीडियावर काही हॉरर व्हिडीओही व्हायरल होत असतात. रिअल घोस्ट म्हणून कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. जो पाहिल्यानंतर सर्वांना धडकीच भरली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका महिलेचं भूत कैद झाली. कुणीच नसलेल्या रस्त्यावर ही महिला अचानक आली आणि अचानक गायबही झाली. आता तर महिलेचं ते भूत सीसीटीव्ही फुटेजमधूनच बाहेर आलं आहे.
उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना. अलिगडमधील महिलेच्या भूताचा हा व्हिडीओ पाहून सर्वांना घाम फुटला. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक गल्ली दिसत आहे. रात्र असल्यामुळे या गल्लीत लोकांची ये-जा नाही. अशा शांत रस्त्यावर अचानक हालचाल दिसते, ज्यामध्ये सफेत कपड्यात कोणीतरी आल्याचं जाणवतं. यानंतर सफेद कपड्यामधील ही गोष्ट थोडी लांबच्या दिशेने चालत जाते आणि पुढे जाऊन अचानक गायब होते.
हे वाचा - चिमुकल्या लेकीच्या रूममधील 'ते' भयावह दृश्य पाहून वडिलांना दरदरून फुटला घाम; Shocking Video Viral
पत्रकार दिनेश कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला होता. ट्विटर पोस्टमध्ये त्यांनी दिलेल्या माहितनुसार न्यू राजेंद्रनगर परिसरातील हे सीसीटीव्ही फुटेज आहे.
लोकांचं असं म्हणणं आहे ती सफेद रंगात दिसणारी ती गोष्ट म्हणजे एक भूत आहे, जे अचानक आलं आणि गायब देखील झालं. अखेर त्या भुताचं सत्य समोर आलं आहे. किंबहुना ते भूतच सर्वांसमोर आलं आहे.
UP अलीगढ़ : CCTV में कैद हुआ भूत का वीडियो, वीडियो हो रहा है सोशल मीडिया पर वायरल, भूत इलाके में बना हुआ है चर्चा का विषय, अलीगढ़ के बन्नादेवी थाना क्षेत्र के न्यू राजेंद्र नगर का बताया जा रहा है वायरल वीडियो।https://t.co/9qkBx39eXk pic.twitter.com/mbcFr0Kmk8
— Dinesh Kumar (@DineshKumarLive) January 24, 2023
सीसीटीव्हीमध्ये दिसलेली ती महिला भूत नव्हे तर जिवंत महिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती महिला स्वतः समोर आली आणि ती आपणच असल्याचा दावा तिने केला आहे.
पत्रकार पियुष राय यांनी या महिलेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना महिलेनं सांगितलं की ते रोज पहाटे नळावर पाणी आणायला जाते.
A viral video of a woman being claimed to be a ghost had surfaced on social media. The "ghost" woman has been traced and she spoke to the local media in UP's Aligarh. She said she steps out of her house early every morning to fetch water from tap. pic.twitter.com/MPxhJA1xyG
— Piyush Rai (@Benarasiyaa) January 28, 2023
कुणीतरी मुद्दामहून आपल्यासोबत असं करत असल्याचा, आपल्याला भूत बनवत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Horror, Uttar pradesh, Viral, Viral videos