मराठी बातम्या /बातम्या /Viral /जे करायचं नव्हतं तेच केलं, दारुड्याने फटाका लावला आणि.... Video पाहून पोट धरुन हसाल

जे करायचं नव्हतं तेच केलं, दारुड्याने फटाका लावला आणि.... Video पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून तुमच्या पोटात दुखू लागेल. हो कारण हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की, तुम्ही पोट धरुन हसाल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 06 फेब्रुवारी : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. येथे कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. तसेच इथे इतके मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात की ते पाहण्यात तुमचा वेळ कसा निघून जातो, हे तुमचं तुम्हाला कळत नाही. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या पोटात दुखू लागेल. हो कारण हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की, तुम्ही पोट धरुन हसाल.

    हा व्हायरल व्हिडीओ फटाक्यांसंबंधी आहे, त्यामुळे तो दिवाळीच्या काळातला असावा असं म्हटलं जात आहे.

    या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती दारु प्यायलेली असल्याचे दिसत आहे, ती व्यक्ती दारुच्या नशेत असं काही करतो की त्याची अवस्था फारच खराब होऊन जाते.

    हे ही पाहा : हेल्मेट घालत, काळजी घेत बकरीवर स्वार झाला खरा, पण थोड्याच वेळात धपकन पडला चिमूकला, मजेदार व्हिडीओ व्हायरल

    खरंतर ही व्यक्ती आपल्या घराबाहेर फटाके फोडत असते, तेव्हा ही व्यक्ती आपल्या हातात एक फटाका घेते आणि तो लाइटरने पेटवते. इथ पर्यंत सगळं ठिक चाललेलं असतं, पण खरा गेम तर त्यानंतर पलटतो. या व्यक्तीला हातातील बॉम्ब भांड्याखाली ठेवून लाईटर घेऊन तेथून पळून जायचं होतं, पण ही व्यक्ती त्याच्या अगदी उलट करते आणि लाईटर भांड्याखाली ठेवून, हातात बॉम्ब घेऊन तेथून निघून जाते.

    काही सेकंदानंतर बॉम्ब फुटतो तो थेट या व्यक्तीच्या हातात. ज्यामुळे त्याची अगदी वाईट अवस्था होते.

    Peene ke baad #Pataakhe mat chalayen Happy Diwali 2022 everyone !#INDvsPAK2022 #INDvsPAK pic.twitter.com/jWAIUb02oi

    — Rupin Sharma IPS (@rupin1992) October 24, 2022

    व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या घरातून धूर येऊ लागतो आणि काही सेकंदानी ती व्यक्ती घराबाहेर पडते. या व्यक्तीचं तोंड काळं झालेलं दिसत आहे, तसेच तिचे कपडे देखील सर्वत्र फाटलेले दिसत आहेत.

    हा व्हिडीओ भारतीय सेवा अधिकारी रुपिन शर्मा आयपीएस यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे - दारू पिऊन फटाके पेटवू नका. या व्हिडीओ मधील ही व्यक्ती खरंच दारु पिऊन असं करत आहे की, हे फक्त लोकांना सांगण्यासाठी एक उदाहरण म्हणून बनवला गेलेला व्हिडीओ आहे. हे कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ खरंच खूप मजेदार आहे.

    First published:

    Tags: Funny video, Social media, Top trending, Videos viral, Viral