मराठी बातम्या /बातम्या /Viral /कासवानं काढली छेड, कुत्र्याला राग आल्यावर बसलं लपून, लोक म्हणाले 2021 चा Best Video

कासवानं काढली छेड, कुत्र्याला राग आल्यावर बसलं लपून, लोक म्हणाले 2021 चा Best Video

कासव हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र जेव्हा कासव छेडछाड करू लागतं, तेव्हा इतर प्राण्यांना कसा राग येऊ शकतो, याचं उदाहरण या व्हिडिओतून बघायला मिळतं.

कासव हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र जेव्हा कासव छेडछाड करू लागतं, तेव्हा इतर प्राण्यांना कसा राग येऊ शकतो, याचं उदाहरण या व्हिडिओतून बघायला मिळतं.

कासव हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र जेव्हा कासव छेडछाड करू लागतं, तेव्हा इतर प्राण्यांना कसा राग येऊ शकतो, याचं उदाहरण या व्हिडिओतून बघायला मिळतं.

नवी दिल्ली, 15 डिसेंबर: शांत बसलेल्या कुत्र्याची (Dog) छेड काढणारं कासव (Naughty tortoise) आणि त्याला चिडून (Angry Dog) प्रतिसाद देणारा कुत्रा यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार (Viral Video) व्हायरल होत आहे. प्राण्यांबाबतचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यातील बहुतांस व्हिडिओ हे एकट्या प्राण्यांचे किंवा प्राण्यासोबत माणसांचेही असतात. मात्र दोन प्राणी आपापसात खेळत असल्याचा हा दुर्मिळ व्हिडिओ असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

 कासवाने काढली छेड

या व्हिडिओत शांत पहुडलेल्या एका कुत्र्याची त्याच्या शेजारी असणारं कासव छेड काढताना दिसतं. ते कुत्र्याच्या तोंडाचा आणि कानाचा चावा घेतं. सुरुवातीला कुत्रा त्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र कासवाची छेडछाड सुरूच राहते. काही वेळाने कुत्रा वैतागतो आणि त्याच्यावर हल्ला करू पाहतो.

हे वाचा -

कासव लपलं शेलमध्ये

आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात येताच आपल्या शेलमध्ये लपण्याचं वरदान कासवाला लाभलेलं असतं. कासवाला संकटाच्या स्थळावरून पळ काढणं शक्य नसतं. त्यामुळे संकटाची चाहूल लागताच कासव आपल्या शेलमध्ये जाऊन लपतं. कुत्रा आपल्यावर हल्ला करणार हे लक्षात येताच कासव त्याच्या शेलमध्ये जाऊन बसतं. कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो, मात्र कासवाला काहीच होत नाही. काही वेळाने कुत्रा शांत होतो आणि पुन्हा आपल्या जागेवर बसतो. कुत्रा शांत झाल्याचं पाहून कासव पुन्हा शेलमधून बाहेर येतं आणि कुत्र्याची छेड काढायला सुरुवात करतं. दोन प्राण्यांमधला हा खेळ पाहणं युजर्सना फारच आवडल्याचं चित्र आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडतो आहे. 2021 हे वर्ष संपायला आता काही दिवसच बाकी आहेत. या वर्षात आतापर्यंत पाहिलेला हा सर्वोत्तम व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे.

First published:
top videos