नवी दिल्ली 25 मार्च : सोशल मीडियावर लोकप्रियता आणि व्ह्यूज मिळविण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. आजकाल लोक व्हायरल होण्यासाठी प्राण्यांचाही वापर करू लागले आहेत. दररोज इंटरनेटवर प्राण्यांशी संबंधित शेकडो व्हिडिओ अपलोड केले जातात. या व्हिडिओमधील प्राण्यांची मजेशीर कृत्ये आणि मस्ती पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीत. आता एका व्हिडिओमध्ये एक मुलगा व्हायरल होण्यासाठी गाढवाचा आधार घेताना दिसत आहे. हा मुलगा गाढवाला आरसा दाखवतो, यानंतर स्वतःचा चेहरा पाहून गाढव जी प्रतिक्रिया देतं ती खूप मजेशीर आहे. कुत्र्याचा स्वॅग पाहून व्हाल थक्क, कॅमेरा सुरु करून केलं असं काही…Video Viral व्हायरल होत असलेल्या या मजेदार व्हिडिओमध्ये गाढवाला आरशात आपला चेहरा दिसत होता. यानंतर त्याची प्रतिक्रिया अशी येते की जणू त्याला आरशात दुसरं गाढव दिसलं आहे. कदाचित हाच विचार करून या गाढवाला राग येतो आणि तो जोरजोरात ओरडू लागतो. गाढवाची अशी प्रतिक्रिया बघून तुम्हीही पोट धरून हसाल.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, अचानक स्वतःला आरशात पाहिल्यानंतर गाढवाला धक्का बसतो. गाढवाला काय करावं समजत नाही. स्वतःला आरशात पाहून हे गाढव पुरतं गोंधळून जातं. माझ्यासारखा दिसणारा गाढव अचानक कुठून आला हे आधी त्या गाढवाला समजत नाही, मग आरशाला पाहून तो चेहरा हलवू लागला. समोरचं गाढवही तोंड हलवत असल्याचं त्याला दिसलं. हे पाहून त्याला एकदम धक्काच बसला. यानंतर तो थोडावेळ बघत राहिला आणि अचानक ओरडण्यास सुरुवात केली
हा व्हिडिओ beautiful new pix नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये या प्राण्याची प्रतिक्रिया इतकी मजेदार आहे की लोक हा व्हिडिओ लूपमध्ये पाहत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर मोठं हसू आलं असेल. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि लाईक केला आहे.