नवी दिल्ली 04 डिसेंबर : जगात रक्ताची नाती माणूस निवडत नाही. ती नाती जन्मापासूनच आपल्यासोबत जोडली जातात. मात्र, मित्र हे एक असं नातं आहे जे माणूस स्वतः बनवतो. चांगले मित्र (Friends) मिळाले की आयुष्यातील सर्व चिंताही संपून जातात, मात्र मित्र चुकीचे असतील तर आयुष्य वेगळ्या वळणावरही जातं. मैत्रीत लोक कसल्याही अडचणीत एकमेकांसाठी उभा राहतात. एकमेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते काहीही करू शकतात. अशाच एक मैत्रिणी स्टोरी इक्वेडोर येथे पाहायला मिळाली. यात काही तरुणांनी आपल्या मित्राच्या मृत्यूनंतर त्याची इच्छा पूर्ण (Last Wish of Friend) केली.
साउथ अमेरिकेच्या इक्वेडोर येथे राहणाऱ्या एरिक सडेनो याचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या मित्रांनी एरिकच्या घरच्यांची परवानगी घेऊन त्याचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला (Friends Yank Dead Friend out From Coffin). यानंतर मृतदेहाला गाडीवर बसवून त्याच्या आवडत्या ठिकाणाची राईड (Bike Ride) केली. रस्त्यावरील हे दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. लोक हे पाहून हैराण होते की हे तरुण रस्त्यावर मृतदेहासोबत फिरत होते. अनेकांनी याचे फोटो आणि व्हिडिओ काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास सात लोकांचा ग्रुप रस्त्यावर बाईकवरुन निघाला होता. यातील एका बाईकवर मृतदेह घेऊन दोघे बसले होते. स्थानिक माध्यम La Republica च्या वृत्तानुसार, हे लोक आपल्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करत होते. एरिकला बाईक राईड खूप आवडत असे. इतकंच नाही तर त्यांनी कबरीवर दारूची थेंबही शिंपडले.
21 वर्षीय एरिकचं मागील आठवड्यात निधन झालं. त्यादरम्यान एरिकचे मित्र येऊ शकले नाहीत. एक आठवड्यानंतर ते इथे पोहोचले तेव्हा त्यांनी एरिकच्या पालकांकडून परवानगी घेतली आणि त्याचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि बाईकवर बसून फिरवला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तपास सुरू केला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचं हे पहिलंच प्रकरण पाहायला मिळालं आहे. याआधी अशी घटना कधीच घडली नाही. कोरोना काळात अशा प्रकारचं कृत्य बरोबर नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या प्रकरणात अद्याप तरी कोणावरही कारवाई केली गेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.