मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Oh no! तरुणाच्या हातातल्या केळ्याऐवजी माकडाने भलतीकडेच मारला हात; VIDEO VIRAL

Oh no! तरुणाच्या हातातल्या केळ्याऐवजी माकडाने भलतीकडेच मारला हात; VIDEO VIRAL

माकडाला जबरदस्ती खायला घालणं त्याला चांगलंच महागात पडलं.

माकडाला जबरदस्ती खायला घालणं त्याला चांगलंच महागात पडलं.

माकडाला जबरदस्ती खायला घालणं त्याला चांगलंच महागात पडलं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 12 ऑक्टोबर : आपल्यासमोर एखादा प्राणी आला आणि आपल्या हातात काही खायला असेल तर आपण त्या प्राण्याला देतोच किंवा प्राणीसंग्रहालयात फिरायला गेल्यावर तिथल्या प्राण्यांनाही आपण खायला देतो. अशाच एका माकडाला (Monkey video) एक तरुण खायला देत होता. मग माकडाला खायला (Monkey eating banana) देणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे (Monkey attack video). माकड्याने तरुणाच्या हातातल्या खाण्याऐवजी भलतीकडेच आपला हात मारला (Man give banana to monkey).

माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक तरुण माकडाला खेळं खायला घालण्याचा प्रयत्न करतो आहे. तरुण आपल्या हातात सोललेलं केळं धरून माकडाला भरवण्याचा प्रयत्न करतो, पण माकडाचा मूड काही वेगळाच होता. त्याने केळं तर खाल्लं नाहीच पण त्या तरुणासोबत असं काही केलं की पाहून धक्काच बसले.

हे वाचा - VIDEO - छोट्याशा मांजराला घाबरला चित्ता; शिकार करायला गेला आणि स्वतःच पळाला

व्हिडीओत पाहू शकता, एक माकड पिंजऱ्यात बंद आहे. जाळीसमोर तो बसला आहे. एका व्यक्तीने त्याच्या तोंडासमोर केळी धरली आहे. माकडाला तो केळी खायला घालण्याचा प्रयत्न करते. माकडाला काही केळी खाण्याची इच्छा नाही. त्यामुळे केळ्यासमोरून तो आपलं तोंड फिरवताना दिसतो. पण ही व्यक्ती माकडाच्या तोंडाजवळ केळं नेत राहते आणि माकडाला जबरदस्ती केळं खायला घालण्याचा प्रयत्न करते.

माकड आधी शांत बसलेलं आहे. तो बघून बघून घेतो आणि समोरची व्यक्ती काही ऐकत नाही म्हटल्यावर माकडच आक्रमक होतो. ही व्यक्ती माकडाला केळं खायला घालताना आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत असते. त्या मोबाईलवरच हा माकड हात मारतो. व्यक्तीच्या हातातला मोबाईल खाली पडतो.

हे वाचा - कुत्र्याने पूर्ण केला मुलाचा Home Work; अत्यंत सुंदर Video सोशल मीडियावर व्हायरल

@HoodComedyEnt  या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिजीओ शेअर करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.  बहुतेक नेटिझन्सनी माकडाला जबरदस्ती खायला घालणाफ्या या व्यक्तीवरच टीका केली आहे.जबरदस्ती खायला घालण्याचा परिणाम पाहा, माकडाने केळं खायला घालणाऱ्या व्यक्तीसोबत योग्यच केलं आहे, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wild animal