बीजिंग, 10 फेब्रुवारी : ‘अरे लग्न कधी करणार, आता वय झालं, आता तरी लग्न कर…’, वयाची पंचविशी ओलांडली की बरेच जण सिंगल असलेल्यांना असा प्रश्न विचारतात. तुम्हालाही असं किती तरी जणांनी विचारलं असेल. आईवडिल म्हणू नका की नातेवाईक लग्न कर, लग्न कर असं म्हणणारे किती तरी जण आहेत. पण लग्नासाठी तगादा लावणं हा विचित्र आजार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? लग्नासाठी एखाद्यावर इतका दबाव टाकल्याने विचित्र आजार जडतो आहे. एका महिलेच्या बाबतीत हे घडलं आहे, जी आपल्या मुलावर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि तिला विचित्र आजार झाला. चीनमधील हे विचित्र प्रकरण आहे. हेनान प्रांतातील 38 वर्षांची व्यक्ती जिचं आडनाव वांग आहे. इतकं वय होऊनही त्याने लग्न केलं नव्हतं. आपल्या मुलाने लग्न करावं किंवा किमान त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला तरी घरी आणावा, आपली होणारी सून आपल्या घरी यावी, तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटावं असं त्याच्या आईला वाटत होतं. त्यासाठी ती आपल्या मुलाच्या मागेच लागली होती. नवीन वर्ष आलं की ती आपल्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडला आपल्या घरी आणण्यासाठी दबाव टाकायची. पण त्याने आईचं कधीच ऐकलं नाही. हे वाचा - लेकाचं लग्न बाबाच्या जीवावर बेतलं! तो विषयच नको म्हणून मुलाने म्हाताऱ्या वडिलांनाच संपवलं त्यामुळे आपल्या मुलाला काही मानसिक आजार तर नाही ना, अशी भीती या आईला वाटू लागली. 2020 सालापासून दरवर्षी ती आपल्या मुलाला मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासासाठी घेऊन जाते. त्याच मानसिक आरोग्य ठिक, नाही, असं तिला वाटतं. डॉक्टर वांगला तपासायचे आणि तो बिलकुल ठिक असल्याचे सांगायचे. पण तरी ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन जात होती आण वांगही आईच्या समाधानासाठी डॉक्टरांकडे जात होता. या वर्षीही 4 फेब्रुवारीला वांगची आई त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली पण डॉक्टरांनी त्यांना जे सांगितलं त्यामुळे धक्काच बसला. खरंतर गर्लफ्रेंडला घरी न आणणाऱ्या त्या मुलाला नव्हे तर तिला घरी आण सांगणाऱ्या त्याच्या आईलाच मानसिक आजार झाला होता. मुलावर लग्नासाठी दबाव टाकण्याचा फोर्स टू मॅरी डिसॉर्डर असा हा आजार. हे वाचा - VIDEO - नवरी राहिली बाजूलाच, नवरदेवाला घेऊन घोडीच झाली फरार; पाहा लग्नाची अजब वरात आपल्या आईला झालेल्या या विचित्र आजाराची माहिती देणारा वांगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वांग एक अभिनेता आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो बीजिंगमध्ये काम करतो आहे. आता तो टेनिस कोच आहे. त्याच्या गावात त्याला ओल्ड सिंगल मॅन म्हणू ओळखलं जातं. इतकं वय होऊनही त्याने लग्न का नाही केलं, असं विचारताच त्याने आपल्याला योग्य जोडीदार मिळालं नसल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.