नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेल (Flipkart big billion days sale) 3 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या सेलच्या ऑफर्सबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. मात्र iPhones वर मिळणारी ऑफर सध्या खूप चर्चेत आहे. तसं पाहता फ्लिपकार्ट एक विश्वासार्ह ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) प्लॅटफॉर्म मानलं जातं. मात्र कधी कधी यातही गोंधळ होतो. नुकताच एका युजरने सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली. कारण त्याला iPhone 12 ऑर्डर केला असता भलतच काहीतरी मिळालं. जर एखाद्याने iphone 12 ची ऑर्डर केली असेल तर त्याची उत्सुकता किती असेल याचा आपण विचार करू शकतो. मात्र जेव्हा डिलिव्हरी घरी येते मात्र त्यात आयफोन 12 दिसत नाही. तर त्यावेळी व्यक्तीची काय अवस्था होईल, याचा विचार न केलेलाच बरा. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
iPhone 12 च्या ऐवजी मिळाली साबणाची वडी
गिज्मोचाइनाच्या रिपोर्टनुसार, सिमरनपाल सिंह नावाच्या एका युजरने असा दावा केला आहे. सिमरनपालने फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमधून 53 हजार रुपयांचा iPhone 12 ऑर्डर केला होता.
हे ही वाचा-Ola Cars: केवळ टॅक्सी सेवा नाही तर आता खरेदी करा जुनी-नवी वाहनं सुद्धा
मात्र जेव्हा त्याला डिलिव्हरी मिळाली तर त्यात एका डब्यात फोनऐवजी निरमा साबणाची वडी होती. GoAndroid नावाच्या एका पेजने यूट्यूबवर याचा एक व्हिडीओदेखील अपलोड केला आहे. सिमरनपालने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा त्यात साबण होते. त्यामुळे त्याने पहिल्यांदा डिलिव्हरीला कन्फर्म करणाऱ्या ओटीपीच्या रिक्वेस्टला नकार दिला, ज्यामुळ कंपनीकडे ऑर्डरची डिलिव्हरी पेंडिंग असल्याची सूचना गेली.
फ्लिपकार्टची प्रतिक्रिया..
अनेक दिवसांपासून प्रयत्न आणि डिलिव्हरी करणाऱ्याशी बातचीत केल्यानंतर ओपन बॉक्स डिलिव्हरीच्या ऑप्शनमुळे फ्लिपकार्टने आपली चूक मान्य केली आणि ऑर्डर कॅन्सर करीत रिफन्ड दिला. त्यानंतर रिफन्डचे पैसे यूजरच्या अकाऊंटमध्ये गेले. नेहमीच असं होतं नाही, मात्र अनेकदा अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या रकमेची डिलिव्हरी घेत असाल तर ओपन बॉक्स डिलिव्हरी ऑप्शनची निवड करा. त्यामुळे डिलिव्हरी घेण्यापूर्वी तुम्ही वस्तू तपासू शकाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.