मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! ... अन् विमानात आलं 'उलटीचं वादळ'; नेमकं काय घडलं पाहा

OMG! ... अन् विमानात आलं 'उलटीचं वादळ'; नेमकं काय घडलं पाहा

वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टी प्रवासात नेहमी सोबत ठेवा.

वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टी प्रवासात नेहमी सोबत ठेवा.

विमानात एकापाठोपाठ एक सर्वच प्रवाशी उलटी करू लागले.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 11 डिसेंबर : प्रवासात काही लोकांना उलटीचा त्रास होतो. पण शक्यतो विमान प्रवासात क्वचित असा त्रास होतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका विमानात एक-दोन नव्हे तर चक्क सर्वच प्रवाशांना उलटी होऊ लागली. जणू काही या विमानात उलटीचं वादळच आलं आणि उलटी करत करतच प्रवाशांनी संपूर्ण प्रवास केला (Passengers Puked in Flight in Ireland).

आपण एकदा तरी विमानातून प्रवास करावा असं प्रत्येकाला वाटतं. विमानातून अगदी जवळून दिसणारे ढग आणि खाली दिसणाऱ्या छोट्या छोट्या इमारती, लाइट्स पाहण्याची मजा काही औरच असते. पण हे विमान जेव्हा वादळातून जातं (Flights Stuck in Storms) तेव्हा मात्र त्याचा प्रवास नकोसा वाटतो. असाच एक भयंकर अनुभव एका विमानातील प्रवाशांनी घेतला आहे.  विमानात प्रवाशी उलटी करून इतके हैराण झाले की त्यांना उलटी करण्यासाठ बॅग्ज देण्यात आल्या (Passengers Puked in Vomiting Bags in Flight).

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार या विमानातील हा विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. काही प्रवासी वॉमिटिंग बॅगेत उलटी करताना दिसले.

हे वाचा - धक्कादायक! स्वतःलाच जिवंत गिळताना दिसला महाकाय साप; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

आयर्लंडमध्ये बर्रा नावाचं वादळ आलं आहे  (Barra Storm in Ireland). याचा विमानातील प्पवशांनाही त्रास झाला आहे  (Flights Stuck in Storms). आयर्लंडची राजधानी डबलिनला जाणारं हे विमान. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वादळामुळे उलटी होऊ लागली.

व्हिडीओतील कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार फ्लाइट डबलिन एयरपोर्टवर लँड होणार होती पण वादळामुळे असं करणं खतरनाक होतं. विमान दोन वेळा लँड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी वादळात उडणारं विमान इतक्या जोराने हलू लागलं की विमानातील बहुतेक लोकांना उलटी होऊ लागली.

हे वाचा - बघता बघता गंगा नदीत वाहून गेली संपूर्ण शाळा, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

डबलिनऐवजी फ्लाइट अॅम्स्टरडॅम स्कीपोल एअरपोर्टवर लँड करण्यात आलं. तिथून प्रवाशांना दुसरं विमान मिळालं. त्या दिवशी इतर एअरपोर्टवरून फ्लाइट वळवण्यात आल्या होत्या. वादळाचा धोका पाहता आयर्लंडच्या हवामान विभागाने ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.

First published:

Tags: Airplane, World news