वॉशिंग्टन, 27 ऑगस्ट : एका वेळी दोन, तीन, चार, पाच अशी मुलं जन्माला आल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती आहेत. पण एकाच बाळाचा दोन वेळा जन्म झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? एका महिलेने 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीच्या कालावधीत एकाच बाळाला एकदा नव्हे तर चक्क दोनदा जन्म दिला आहे. महिलेने आपल्या विचित्र प्रेग्नन्सीचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे (Baby Born Twice). अमेरिकेतील जॅकलीन स्कूमर पहिल्यांदाच आई होते आहे. काही दिवसांत ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल तिने काही दिवसांपूर्वीच या बाळाला जन्म दिला होता आणि आता त्याच बाळामुळे ती पुन्हा प्रेग्नंट झाली आहे. आता हे कसं शक्य आहे, नेमकं हे आहे तरी काय असे एक ना दोन बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. जॅकलीन आपल्या एकाच बाळाला दोनदा जन्म देणार याचं कारण म्हणजे बाळाला असलेली एक समस्या. तिच्या बाळाला स्पाइना बाइफिडा आहे. हा असा आजार आहे जो मुलांना गर्भातच होतो. बाळाच्या पाठीचा मणका नीट विकसित होत नाही. यावर जितक्या लवकर उपचार होतील तितकं चांगलं. त्यामुळे डॉक्टरांनी जॅकलीनच्या बाळाला प्रसूतीच्या तारखेआधीच पोटातून बाहेर काढलं आणि त्याच्या पाठीची सर्जरी करून त्याला पुन्हा पोटात ठेवण्यात आलं. हे वाचा - Pregnancy Symptoms : टेस्टशिवायच कशी ओळखायची प्रेग्नन्सी? लक्षात ठेवा ही 4 लक्षणं द सनच्या रिपोर्टनुसार जॅकलिनच्या प्रेग्नन्सीच्या 23 व्या आठवड्यात ही सर्जरी झाली. तिच्या प्रेग्नन्सीला आता ३० आठवडे पूर्ण झाले आहेत. आणखी 14 आठवडे बाळ आता गर्भात राहणार आणि पुन्हा डिलीव्हरी झाल्यानंतर ते या जगात येणार आहे. जॅकलिने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये एका व्यक्तीने हे कसं शक्य आहे, गर्भातील एमनिऑटिक सॅक आणि फ्लुएडचं नंतर काय होतं, असे प्रश्न विचारलं. याबाबत अधिक माहिती देताना जॅकलीनने सांगितलं की, बरंच फ्लूएट निघून जातं त्यामुळे फोर फ्लुएड नावाचा एक घटक गर्भात टाकला जातो ज्यामार्फत बाळ स्वतःच फ्लूएड बनवू लागतं. त्यानंतर सॅक बंद केली जाते. हे वाचा - OMG! जुळ्या भावांशी लग्न केलेल्या जुळ्या बहिणींच्या मुलांचा DNA एकच; पाहून सर्वजण चकीत हे फ्लूएड लेव्हल योग्य प्रमाणात आहे की नाही हे तपासण्यासाठी जॅकलीन दर आठवड्याला डॉक्टरांकडे जाते. आता काही दिवसांनी तिची सिझेरिअन डिलीव्हरी केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.