मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! सलूनमध्ये केस कापायला गेली तरुणी; हेयर स्टाइलिस्टने कात्रीऐवजी उचललं लायटर आणि...; VIDEO VIRAL

OMG! सलूनमध्ये केस कापायला गेली तरुणी; हेयर स्टाइलिस्टने कात्रीऐवजी उचललं लायटर आणि...; VIDEO VIRAL

हेअरस्टालिस्टने हेअर कटिंगसाठी आलेल्या तरुणीसोबत जे केलं ते पाहूनच धडकी भरेल.

हेअरस्टालिस्टने हेअर कटिंगसाठी आलेल्या तरुणीसोबत जे केलं ते पाहूनच धडकी भरेल.

हेअरस्टालिस्टने हेअर कटिंगसाठी आलेल्या तरुणीसोबत जे केलं ते पाहूनच धडकी भरेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 31 डिसेंबर : आपल्या लूकमध्ये केसही फारही महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्वांपेक्षा आपले केस (Hair cut video) थोडे हटके असावेत जेणेकरून आपण हटके दिसू असा प्रयत्न अनेकांचा असतो. केसांना वेगळा लूक देण्यासाठी आता केसांना कलर केला जातो, वेगवेगळ्या हेअरस्टाईल केल्या जातात किंवा हेअरकट केला जातो. असाच हेअरकट घेण्यासाठी एक तरुणी सलूनमध्ये गेली. तिथं ज्या पद्धतीने तिचा हेअरकट करण्यात आला ते पाहून तुम्हाला धडकीच भरेल (Shocking Hair cut video).

केस कापायचे म्हणले की सामान्यपणे कात्रीचा वापर केला जातो. पण इथं मात्र सलूनमधील हेअरस्टालिस्टने कात्रीऐवजी हातात लायटरच घेतलं आणि लायटरने तरुणीचे केस पेटवले (Stylist Fire Haircut).

व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी खुर्चीवर बसली आहे. तिच्या केसांना चंदेरी रंगाच्या पट्ट्या लावण्यात आला आहे. हेअरस्टायलिस्टच्या हातात कात्रीऐवजी लायटर दिसतं. तो लायटर घेतो आणि त्या तरुणीच्या केसांवरून फिरवतो. त्यानंतर तरुणीचे केस हातात धरून ते त्या लायटरने अक्षरशः पेटवतोच. तिचे कस पेटताना दिसतात.

व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरली असेल. या तरुणाने चुकून असं केलं का, असंच तुम्हाला वाटेल. पण असं बिलकुल नाही.  हा फायर हेअरकट आहे. हेअरकट करण्याची ही नवी पद्धत आहे. ज्यात कात्रीऐवजी केसांना आग लावून केस कापले जातात. ही तरुणीसुद्धा बिनधास्त शांतपणे खुर्चीत बसली आहे. आपला युनिक हेअरकट ती करून घेताना दिसत आहे.

हे वाचा - लय भारी! 'दिलबर दिलबर'वर शालेय मुलाचे जबरदस्त ठुमके; याच्यासमोर नोरा फतेहीही फेल

@headmasterspatiala इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. फायर हेअरकट असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

First published:

Tags: Viral, Viral videos, Woman hair