मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भयंकर! दुभंगली जमीन अन् अचानक निघाल्या आगीच्या ज्वाळा, पाहा थरारक VIDEO

भयंकर! दुभंगली जमीन अन् अचानक निघाल्या आगीच्या ज्वाळा, पाहा थरारक VIDEO

पाऊस झाला तरीही ही आग विझत नाही असा दावा स्थानिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे.

पाऊस झाला तरीही ही आग विझत नाही असा दावा स्थानिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे.

पाऊस झाला तरीही ही आग विझत नाही असा दावा स्थानिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे.

    जैसलमेर, 23 जुलै: आतापर्यंत आपण जमीन दुभंगून आग दिसते हे सिनेमा किंवा सिरियरलमध्ये पाहिलं आहे. अनेक कथांमध्ये वाचलं किंवा ऐकलं असेल पण अशीच एक अजब घटना समोर आली आहे. ही घटना ऐकूनच परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. राजस्थानमधील जैसलमेर परिसरात भारत-पाकिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या रामगड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर, लोंगेवाला रस्त्यालगत असलेल्या जमीनीतून आगीच्या ज्वाळा निघत आहेत. यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. हे वाचा-ठेच लागली अन् नशीब चमकलं! मजुराला मिळाला 10.68 कॅरेट हिरा मिळालेल्या माहितीनुसार 5 मीटर अंतरावर असलेल्या एका मैदानात जमीन दुभंगली आहे. या जमिनीचून ज्वाळा बाहेर येत आहेत. दिवसा ही आग दिसत नाही रात्रीच्या वेळी ही प्रखर होते. या भागांत बऱ्याच दिवसांपासून ही आग जळत असल्याचं इथल्या स्थानिक आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. इथे पाऊस झाला तरीही ही आग विझत नाही असा दावा स्थानिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात तेलाच्या साठ्याचा शोध घेण्यात आला पण काहीच न आढळल्यानं खोदलेला खड्डा बंद करण्यात आला. त्यानंतर या परिसरात अचानक आगीच्या ज्वाळा दिसल्यानं मोठी खळबळ उडाली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Rajasthan, Viral video.

    पुढील बातम्या