जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अन्न पॅक करताना कर्मचारी थुंकल्याचा दावा; VIDEO व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल

अन्न पॅक करताना कर्मचारी थुंकल्याचा दावा; VIDEO व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल

Photo - Social Media

Photo - Social Media

व्हिडिओत उभा असलेला माणूस अन्न पॅक करताना त्यात थुंकत आहे.

  • -MIN READ Trending Desk Ghaziabad,Uttar Pradesh
  • Last Updated :

    गाझियाबाद, 27 मे : एखाद्या दिवशी घरी जेवण तयार करायचा कंटाळा आला, तर आपण बाहेर जेवायला जातो किंवा ऑनलाइन जेवण ऑर्डर करतो. आता तर प्रत्येक शहरातली लहान-मोठी रेस्टॉरंट्स, तसंच फूड आउटलेट्स ऑनलाइन ऑर्डर घेऊन डिलिव्हरी करतात; पण हे खाद्यपदार्थ पॅक होताना कर्मचारी किती स्वच्छता बाळगतात याबद्दल जेवण मागवणाऱ्याला काहीच माहिती नसते. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत काही तरी अस्वच्छता केली गेल्याचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. इतकंच नव्हे, तर या प्रकरणाला आता धार्मिक रंगही मिळाला आहे. या संदर्भातलं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमधल्या एका फूड आउटलेटमध्ये एक किळसवाणा प्रकार घडला आहे. फूड आउटलेटमध्ये एक कर्मचारी खाद्यपदार्थांच्या पॅकेटमध्ये थुंकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. लोणी परिसरात असलेल्या एका फूड आउटलेटमध्ये हा किळसवाणा प्रकार घडल्याचं समोर आलंय. 32 सेकंदांचा हा व्हायरल व्हिडिओ त्या फूड आउटलेटच्या जिन्यावरून चित्रित करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दोन पुरुष कर्मचारी अन्न पॅक करताना दिसत आहेत. एक जण अन्न पॅक करतोय तर दुसरा तिथेच इतर पदार्थ घेताना आणि वावरताना दिसतोय. त्यात अन्न पॅक करणारा कर्मचारी त्या अन्नात थुंकल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडिओ जिन्यावरून शूट करण्यात आल्याने तो अस्पष्ट आहे. त्यामुळे त्यात कर्मचारी स्पष्टपणे थुंकताना दिसत नाही; पण व्हिडिओ शूट करणाऱ्याने मात्र तो थुंकल्याचा दावा केला आहे. त्यानंतर एका धार्मिक संघटनेने त्याची दखल घेऊन तक्रारही दिली आहे. हिंदू युवा वाहिनी या हिंदू संघटनेच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओत उभा असलेला माणूस अन्न पॅक करताना त्यात थुंकत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे हॉटेल एका विशिष्ट धार्मिक गटाशी संबंधित आहे आणि कर्मचाऱ्याने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींसाठी बनवलेल्या जेवणात हे कृत्य केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्हिडिओमध्ये दिसणार्‍या संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सध्या सुरू आहे. त्यामुळे अन्न पॅक करणारा कर्मचारी त्या जेवणात थुंकला होता की नाही, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात