मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्री-वेडिंग शूटवेळी नवरीचं संतापजनक कृत्य; पोलिसांनी ठोठावला 15 हजारांचा दंड, Video Viral

प्री-वेडिंग शूटवेळी नवरीचं संतापजनक कृत्य; पोलिसांनी ठोठावला 15 हजारांचा दंड, Video Viral

नवरीला 15 हजारांचा दंड (प्रतिकात्मक फोटो)

नवरीला 15 हजारांचा दंड (प्रतिकात्मक फोटो)

आपल्या अनोख्या प्री-वेडिंग शूटमुळे नवरी तोट्यात गेली आणि पोलिसांनी तिला दंड ठोठावला. रिपोर्ट्सनुसार, या कृत्यामुळे पोलिसांनी या वधूला 15,000 रुपयांचे चलन जारी केले आहे.

नवी दिल्ली 25 मे : आजकाल अनेक लोक लग्नाआधी प्री वेडिंग शूट करून घेतात. यासाठी अनेकांना समुद्र किनाऱ्यावर जायला आवडतं, तर काहीजण डोंगरावर बसून शूट करून घेतात. लोकांच्या या छंदांमुळे आजकाल अनेक एजन्सींचा व्यवसाय जोरात सुरू आहे. तसं पाहिलं तर हा सगळा खेळ एक आयडिया आहे. पण बरेचदा लोक आपलं लग्न खास बनवण्यासाठी स्वतःचं नुकसान करून घेतात. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. ज्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर वधूची एक व्हिडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नववधू अतिशय स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहून समजतं की, प्री-वेडिंग शूट करण्यासाठी तिने वेगळी पद्धत अवलंबली आहे. पण तिच्या या अनोख्या कल्पनेमुळे ती तोट्यात गेली आणि पोलिसांनी तिला दंड ठोठावला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कृत्यामुळे पोलिसांनी या वधूला 15,000 रुपयांचे चलन जारी केले आहे.

sachkadwahai नावाच्या अकाऊंटवरून ही क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. ज्याला वृत्त लिहिपर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, 'हे प्री-वेडिंग आहे की स्टंट..' तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'याचा अर्थ असा आहे की लोक काहीतरी वेगळं करण्यासाठी धोका पत्करायलाही मागे हटत नाहीत आणि जीवाशी खेळतात. आणखी एका युजरने लिहिलं की, 'जर थोडीशीही चूक झाली असती, तर दुर्घटना घडू शकत होती.'

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काळा चष्मा घातलेली आणि लग्नाचा पोशाख परिधान केलेली एक महिला फॉर्च्युनरवर बसून वेगवेगळ्या प्रकारे पोज देत आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये विवाह चित्रपटाचं गाणं वाजत आहे. यासोबतच रस्त्यावरुन जाणारे लोकही आश्चर्याने वधूकडे बघत आहेत. कॅमेरामन गाडीसमोर उभा राहून रेकॉर्डिंग करत असल्याचं क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Bride, Pre wedding photo shoot, Shocking video viral