मुंबई, 20 डिसेंबर : आजकाल सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्युजनची विविध फोटो, पेटिंग व्हायरल होतात. यातील विशिष्ट गोष्ट काही सेकंदांत शोधण्याचं आव्हान दिलं जातं. आतापर्यंत अशी अनेक पेटिंग किंवा फोटो नेटिझन्ससाठी आव्हान ठरली आहेत. मात्र, सध्या एक ऑप्टिकल इल्युजन खूपच चर्चेत आलं आहे. यामध्ये एका खेळण्याच्या पत्त्यांच्या कॅटमधील एका पानावरील आकडा शोधण्याचं आव्हान देण्यात आलयं. यासाठी अवघ्या 7 सेकंदाचा वेळ दिलाय. ‘ झी न्यूज हिंदी ’ने याबाबत वृत्त दिलंय. ऑप्टिकल इल्युजनचं आव्हान स्वीकारण्याचं प्रमाण आजकाल खूपच वाढत आहे. काही लोकांना गोंधळात टाकणाऱ्या अशा ऑप्टिकल इल्युजनच्या चित्राचं सत्य काय आहे, हे समजण्यासाठी काही तास लागतात. तर काहीजण अवघ्या काही सेकंदात सत्य शोधतात. याचे कारण त्याचं निरीक्षण कौशल्य खूप चांगलं आहे. ऑप्टिकल इल्युजन चित्र, कोडं, टीझर, फोटो, पेटिंग अशा कोणत्याही आकारात आणि स्वरूपात येऊ शकतात. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्ही थोडं थक्क व्हाल. तुम्हाला दिसत असलेल्या एका खेळण्याच्या पत्त्यामधून तिसरा क्रमांक शोधण्याचं आव्हान आहे. आता हा क्रमांक तुम्हाला अवघ्या 7 सेकंदात शोधायचा आहे. कार्डवरील तिसरा नंबर शोधा तुम्ही अनेकदा पत्ते खेळत असाल. या पत्त्यांवर 1 ते 10 पर्यंत संख्या असते आणि इस्पिक, बदाम, किल्वर, चौकट असे चार प्रकारचे क्लब असतात. सध्या, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोतील पत्त्यावर चौकट 8 आहेत. आता आव्हान आहे की, चित्रात दोन 8 नंबर दिले असून यातील तिसरा 8 नंबर शोधून दाखवायचा आहे. मात्र, तो शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंद आहेत. तुमच्या लक्षात येईल की, कार्डवर 8 नंबर दोनदा छापलेला आहे. पण या कार्डवर आणखी एक 8 क्रमांक असून तोच शोधण्याचं तुमचं आव्हान आहे. हे वाचा - रेनडिअरच्या भल्यामोठ्या शिंगांना घाबरलं नाही मांजर! ‘खोड’ काढायला पुढं गेलं अन् 2018 मधील आहे फोटो कार्डच्या वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या कोपऱ्यात 8 क्रमांक दिसतो. आता तिसरा क्रमांक शोधण्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक पहावं लागेल. जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर तुम्हाला भौमितिक पॅटर्नच्या मध्यभागी एक 8 आकार दिसेल, आणि तो डायमंड कार्डच्या वरच्या आणि खालच्या भागाला जोडून 8 चा आकार होतो. ब्रिटनची गॉट टॅलेंट स्पर्धक जेमी रेवेनने ट्विटरवर हे आश्चर्यकारक कार्ड पोस्ट केलं आहे. मात्र, हे जुनं ऑप्टिकल इल्युजन असून हे ट्विट 2018 मध्ये करण्यात आले होते. पण हे आव्हान स्वीकारून ते 7 सेंकदात पूर्ण करणं अनेकांना शक्य झालं नाही.
हे वाचा - नशीब असावं तर असं! दररोज भीक मागणारा मुलगा रातोरात झाला कोट्यधीश दरम्यान, एखाद्या व्यक्तीची एकाग्रता, बुद्धिमत्ता, मानसिक क्षमता आदी गोष्टींची पारख करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजनचा उपयोग होता. सोशल मीडियावर सध्या हा प्रकार खूपच चर्चेत आहे.