जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Optical Illusion : अंकात पोहोणाऱ्या या माशात लपून बसलाय 1, तुम्हाला दिसला का?

Optical Illusion : अंकात पोहोणाऱ्या या माशात लपून बसलाय 1, तुम्हाला दिसला का?

माशात एक शोधा.

माशात एक शोधा.

गोंधळात टाकणार्‍या या ऑप्टिकल इल्युजनमध्ये 10 सेकंदांच्या आत ‘1’ हा अंक शोधायचा आहे.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 07 जुलै : आपला मेंदू कसं कार्य करू शकतो, याबद्दल ऑप्टिकल इल्युजन्स काही आकर्षक तथ्यं आपल्यासमोर मांडतात. रंग, प्रकाश आणि पॅटर्न्स यांची विशिष्ट रचना आपल्या मेंदूची फसवणूक करू शकते, हे एव्हाना सिद्ध झालं आहे. ऑप्टिकल इल्युजनचे भौतिक, शारीरिक आणि संज्ञानात्मक यांसारखे अनेक प्रकार पडतात. हा घटक मनोविश्लेषण क्षेत्राचा एक भाग आहेत. कारण, त्यातून आपल्याला गोष्टी कशा समजतात यावर थोडा प्रकाश टाकता येतो. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्युजन निर्माण करणारा फोटो व्हायरल होत आहे. गोंधळात टाकणार्‍या या ऑप्टिकल इल्युजनमध्ये 10 सेकंदांच्या आत ‘1’ हा अंक शोधायचा आहे. सर्वांत अगोदर यूकेतील एका प्रसिद्ध टॅब्लॉइडने हे ऑप्टिकल इल्युजन रुपातील कोडं शेअर केलं होतं. त्यानंतर एका कोडेप्रेमी व्यक्तीनं आपल्या सोशल मीडिया हँडलवर हे कोडं आणि त्याचं उत्तरं पोस्ट केलं. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये अस्ताव्यस्त पद्धतीनं सूचीबद्ध केलेल्या अंकांच्या समुद्रामध्ये एक गोल्डफिश पोहताना दिसत आहे. Optical Illusion Photo : या माशात लपलेत 2 पक्षी; 5 सेकंदांमध्ये शोधून दाखवा या अंकांच्या समुद्रात ‘1’ हा अंक कमीत कमी वेळात शोधण्याचं आव्हान आहे. हा शोधण्यासाठी तुमच्याकडे जास्तीत-जास्त 10 सेकंद आहेत. या ब्रेन टीझरवर नेटिझन्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार शेअर केले आहेत. सोशल मीडियावर ज्या वेगानं या कोड्याची वेगवेगळी उत्तरं आली आहेत, ते पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. ज्यांना ‘1’ हा अंक सापडला आहे त्यांची नजर नक्कीच घारीप्रमाणं तीक्ष्ण आहे. मात्र, ज्यांना अंक सापडला नाही त्यांनी माशाच्या वरच्या पंखावर लक्ष केंद्रीत करावं. फोटोचं अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की, माशाच्या वरील बाजूच्या पंखात ‘1’ हा अंक लिहिलेला आहे. ऑगस्टबाबत मोठी भविष्यवाणी! ‘तो’ पुन्हा येतोय, टाइम ट्रॅव्हलरचा खळबळजनक दावा सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज्, रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न व्हायरल होतात. लोकांनादेखील असे गोंधळात टाकणारे रिडल्स आणि लॉजिकल रिझनिंगशी संबंधित प्रश्न सोडवायला आवडतात. खरं तर असे ऑप्टिकल इल्युजन्स लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी वापरले जातात. कारण, कठीण कोडी सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंदूचा जितका जास्त वापर कराल तितके तुम्ही हुशार होता.

    News18

    मात्र, सोशल मीडियामुळं सध्या लहान मुलांसोबतच मोठ्या लोकांचंदेखील या ऑप्टिकल इल्युजन्सच्या मदतीनं चांगलं मनोरंजन होत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात