मुंबई, 02 मार्च : दोन मांजरांच्या भांडणाचा एक माकडाने फायदा घेतल्याची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. दोघांच्या भांडणार तिसऱ्याचा लाभ अशी ही बोधकथा. हे प्रत्यक्षातही दिसून आलं आहे. दोन हरणाच्या भांडणाचा पुरेपूर फायदा उचलला तो एका बिबट्याने (Leopard Deer video). आपसातील भांडणामुळे हरणं बिबट्याची शिकार झाली आहेत (Leopard attack on deer). हरण आणि बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात हरणांचा कळप आहे आणि तिथं शिकार करण्यासाठी एक बिबट्या पोहोचला. यावेळी दोन हरणांमध्ये जुंपली. ते भांडणात इतके व्यस्त झाले की त्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याकडेही सुरुवातीला त्यांचं लक्ष गेलं नाही आणि अखेर आपसातील भांडणामुळे ते बिबट्याचे शिकार झाले. व्हिडीओत पाहू शकता जंगलात हरणांचा कळप दिसतो आहे. दोन हरणं एकमेकांना मारत आहे. आपल्या शिंगांनी एकमेकांवर वार करताना त्यांची शिंगं एकमेकांमध्ये अडकतात. ते दोघंही आपली शिंग सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना ते शक्य होत नाही. हे वाचा - बापरे! आधी पळव पळव पळवलं नंतर जमिनीवर आपटलं; एका कोंबड्याने तरुणीचे केले हाल त्याचवेळी तिथं एक बिबट्या पोहोचतो. बिबट्याला पाहताच हरणं घाबरता आणि त्याच अवस्थेत त्याच्यापासून दूर पळतात. जसजशी हरणं फिरतात तसतसा बिबट्याही त्यांच्या मागेमागे फिरताना दिसतो.
आपसी लड़ाई में हिरणों के सींग उलझ गये. मौके का फायदा उठाकर तेंदुआ उनपर हमला करने आ पहुंचा.
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 2, 2022
दुनिया भी ऐसी ही है. आपसी लड़ाई में फायदा कोई और उठा ले जाता है.#सुप्रभात pic.twitter.com/VMrGLF9m4U
या व्हिडीओत तरी हरणं या बिबट्याची शिकार झाली की नाही हे दिसत नाही आहे. पण किमान एका तरी हरणाची बिबट्याने शिकार केली असावी. हे वाचा - जिथं तिथं चर्चा ‘रेशमा’ची; म्हशीने केला विक्रम, लाखो रु. घेऊन ग्राहकांच्या रांगा आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपसातील भांडणात हरणांची शिंगं एकमेकांमध्ये अडकली. संधीचा फायदा घेऊन बिबट्या त्यांच्यावर हल्ला करायला पोहोचला. जगही असंच आहे. आपसातील भांडणाचा फायदा कुणी दुसरंच घेतं. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.