चंदीगड, 02 मार्च : आपण प्रसिद्ध व्हावं, आपल्या नावावर एखादा भारी रेकॉर्ड असावा असं प्रत्येकाला वाटतं. असाच रेकॉर्ड केला आहे तो एका म्हशीने. म्हशीने असा विक्रम केला आहे, ज्यामुळे देशभर या म्हशीची चर्चा आहे. तिचा विक्रम पाहून तिला खरेदी करण्यासाठी लाखो रुपये घेऊन ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत (Haryana reshma buffalo give more milk). हरयाणातील बुढाखेडामधील नरेश कुमार ज्याची म्हैस सुल्तान बुल सर्वात महागडी म्हैस आहे. आता नरेशच्या आणखी एका म्हशीने जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. त्यांची रेशमा नावाच्या म्हैस जिने सर्वात जास्त दूध देऊन राष्ट्रीय विक्रम केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार नरेशने चार वर्षांपूर्वी हिसारच्या भगाना गावातून रेशमाला 1.40 लाख रुपयांना खरेदी करून आणलं होतं. तिला चांगला आहार सुरू केला. तिला हिरवा चारा तर दिला जातोच. पण सोबतच गूळ, मिनरल, राईचं तेल असा चाराही दिला जातो. तिचं दूध काढताना दोन लोक असतात. आता ती इतकं दूध देतं की देशातील सर्वात जास्त दूध देणारी म्हैस म्हणून तिने रेकॉर्ड केला आहे. तिने तब्बल 33 किलो 800 ग्राम दूध दिलं आहे. हे वाचा - एका लग्नाची अजब कहाणी; घोडा-कारऐवजी स्ट्रेचरवर लग्नमंडपात पोहोचला नवरदेव कारण… नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्डने गेल्या वर्षी जेव्हा रेशमा जेव्हा दूध देऊ लागली तेव्हा दर आठवड्याला तिचं दूध काढण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच एनडीडीबीने देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस म्हणून रेशमाचं सर्टिफिकेट नरेशला पाठवलं आहे. ही म्हैस खरेदी करण्यासाठी लोकांनी नरेशला लाखो रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. पण नरेश मात्र या म्हशीला विकण्यासाठी तो तयार नाही. रेशमाला आता विकायचं झालं तर तिची काय किंमत असेल, असं विचारल्यावर नरेशने तिला विकणार नसल्याचं सांगितलं. काही लोक तिच्यासाठी 6 लाख रुपये देण्यासाठी तयार आहेत. पण रेशमाला तो विकणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.