नवी दिल्ली 16 एप्रिल : जेव्हा आपण कोणाला भेटतो तेव्हा आपण त्याला नक्कीच नमस्कार करतो. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. शाळा असो, ऑफिस असो किंवा कोणाचीही भेट असो, आपण हे करतोच. पण ब्रिटनमधील एका शाळेतील शिक्षिकेने तिच्या वर्गातील मुलींना Good afternoon girls म्हणल्यामुळे तिला माफी मागावी लागली. तुम्ही म्हणाल यात काय मोठी गोष्ट आहे? पण संपूर्ण प्रकरण तुम्हाला विचित्र वाटेल.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, शाळेतील शिक्षिकेने दावा केला की तिचा अपमान करण्यात आला आणि तिला माफी मागायला भाग पाडलं. घटनेची माहिती देताना शिक्षिकेने सांगितलं की, एके दिवशी दुपारी ती वर्गात पोहोचली. स्टूडंट्सला शिकवायचं होते. दुपारची वेळ असल्याने तिने त्यांना गुड आफ्टरनिंग गर्ल्स असं संबोधलं. यावर विद्यार्थिनींनी आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या- इथे कोणीही स्त्री म्हणून स्वतःची ओळख ठेवत नाही. मी ओके बोलून एक सामान्य गोष्ट समजून हे तिथेच सोडून दिलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा शिक्षिका वर्गात पोहोचली तेव्हा तिला दिसलं की प्रत्येकाने आपलं नाव आणि आडनाव बोर्डवर लिहिलं आहे. एकीने लिहिलं, आम्हाला त्यांना किंवा त्यांचं म्हणून बोलावलं पाहिजे. हे बघून शिक्षिका स्तब्ध झाली. विद्यार्थीनींच्या मागण्या मान्य करण्यास तिने नकार दिला. यानंतर लंच ब्रेकदरम्यानही तिचा निषेध करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, ही शाळा यूके ट्रस्टचा एक भाग आहे आणि एक अतिशय प्रतिष्ठित शाळा मानली जाते. नंतर तिला शाळेतूनच बंदी घालण्यात आल्याचं पाहून शिक्षिकेला आणखीच आश्चर्य वाटलं. तिला ई-मेल पाठवून जाहीर माफी मागण्यास सांगण्यात आलं. एका स्टूडंटने विरोध केल्यावर हे सर्व सुरू झालं. नंतर त्याला इतर मुलींनीही साथ दिली. आता त्या मुलीची समस्या बालरोगतज्ञ डॉ.हिलेरी कॅस यांच्या नेतृत्वाखाली समजून घेतली जात आहे. याबाबत शिक्षिकेलाही कळविण्यात आलं आहे.