मुंबई, 13 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि झारखंड येथील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत होते. या व्हिडीओमध्ये दोघात तिसऱा आल्यानंतर जो काही गोंधळ होतो ते पाहायला मिळालं होतं. आता मुंबईतील (Mumbai) विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video) काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या तरुणीसोबत रंगेहाथ पकडलं होतं. नवऱ्याला दुसऱ्या तरुणीसोबत पाहताच महिला धावत त्याच्याकडे गेली व तरुणीच्या केस ओढून तिला मारहाण करू लागली. अशीच काहीशी घटना मुंबई विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावर घडली. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी एका तरुणीला चोप देताना दिसत आहे. ही घटना 11 ऑगस्ट रोजी घडली होती. यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी याचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
मुंबईतील विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर बॉयफ्रेंडवरुन तरुणींमध्ये मारहाण. माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस, अशी विचारणा करीत बेदम चोप pic.twitter.com/6BzO4mOWad
— News18Lokmat (@News18lokmat) August 13, 2021
बेदम मारहाण… विक्रोळीच्या सर्व्हिस रोडवर नेहमी सायंकाळी प्रेमी युगूल फिरताना दिसतात. अशात एक तरुणी आपल्या मैत्रिणींना घेऊन आली व तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला गाठलं. आणि तिच्यावर शिव्यांचा मारा केला. याशिवाय माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस अशी विचारणा करीत झिंज्या उपटून मारहाण केली. यावेळी दोन तरुणी एका तरुणीला मारहाण करीत आहे. या तरुणीने लाथा-बुक्क्यांनी तरुणीला मारहाण केली.
हे ही वाचा- VIDEO: एक प्रियकर आणि 2 प्रेयसी; प्रेमासाठी पहिलीने दुसरीला भरबाजारात लोळवलं अशीच एक घटना झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्यात घडली आहे. येथे बुधवारी हा सर्व प्रकार घडला. यामध्ये दोन प्रेयसी एका प्रियकरासाठी भांडण सोडा तर हाणामारी करताना दिसली. एका प्रेयसी आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत चंडिल बाजारात फिरत असल्याचं कळताच तिथे पोहोचली. जेव्हा पहिली प्रेयसी तेथे पोहोचली तेव्हा आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत पाहून तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती त्याच्या दुसऱ्या प्रेयसीसोबत भररस्त्यात वाद घालू लागली.