मराठी बातम्या /बातम्या /Viral /महामार्गात ठरत होतं अडथळा; शेतकऱ्याने थेट दीड कोटीचं घरच उचलून बाजूला ठेवलं, पाहा VIDEO

महामार्गात ठरत होतं अडथळा; शेतकऱ्याने थेट दीड कोटीचं घरच उचलून बाजूला ठेवलं, पाहा VIDEO

दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हे घर 250 फूट सरकवण्यात आलं आहे. संपूर्ण 500 फूट शिफ्ट करण्यास सुमारे 40 लाखांचा खर्च येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Farmer Moving his House)

दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हे घर 250 फूट सरकवण्यात आलं आहे. संपूर्ण 500 फूट शिफ्ट करण्यास सुमारे 40 लाखांचा खर्च येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Farmer Moving his House)

दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हे घर 250 फूट सरकवण्यात आलं आहे. संपूर्ण 500 फूट शिफ्ट करण्यास सुमारे 40 लाखांचा खर्च येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Farmer Moving his House)

चंदीगड 21 ऑगस्ट : पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दीड कोटी रुपये खर्चून आपल्या स्वप्नातील घर बांधलं आहे. पण आता तो आपलं 2 मजली घर सध्या ज्या जागेवर आहे तिथून 500 फूट दूर सरकवून घेत आहे. सध्या त्याने हे घर 250 फूट सरकवूनही घेतलं आहे, तर आणखी 250 घर सरकवण्याचं काम बाकी आहे. सुखविंदर सिंग सुखी या शेतकऱ्याचं हे घर असून त्यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.

शक्ती नाही युक्तीचा केला वापर! कारचालकाने सशस्त्र दरोडेखोरांना क्षणात पळवून लावलं; पाहा VIDEO

ते म्हणाले, 'हे घर मी शिफ्ट करत आहे कारण ते दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेच्या मार्गावर येत होतं. मला भरपाईची ऑफर देण्यात आली होती पण मला दुसरं घर बांधायचं नव्हतं. हे घर बनवण्यासाठी मी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. आता ते 250 फूट सरकवून घेण्यात आले आहे. सोशल मीडियावर या घराची जोरदार चर्चा सुरू आहे.

शेतकऱ्याचं हे 'स्वप्नातील घर' सध्याच्या जागेपासून 250 फूट दूर सरकवण्यात आलं आहे. मात्र आणखी 250 फूट सरकवणं बाकी आहे. यासाठी काम सुरू आहे. घराचे स्थलांतर करताना कोणतीही हानी होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. रेल्वेपटरीसारख्या मजबूत लोखंडी पटरीवरून घर हळूहळू सरकाविण्यात येत आहे. दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हे घर 250 फूट सरकवण्यात आलं आहे. संपूर्ण 500 फूट शिफ्ट करण्यास सुमारे 40 लाखांचा खर्च येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जॅक्स, गीअर आणि चाकांच्या मदतीने अख्खे घरच हलविण्यात येत असल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : कुत्रा आहे की रॉकेट? बॉल पकडण्यासाठी मारलेली हाय-जम्प पाहून भले-भले चक्रावले!

केंद्र सरकारचा हा महामार्ग भारतमाला प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना हा महामार्ग जोडणार आहे. महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आलं तेव्हा पंजाब सरकारने सुखी यांना घरासाठी नुकसानभरपाई देऊ केली होती. मात्र, भरपाई घेऊन पुन्हा नवे घर बांधण्याऐवजी सुखी यांनी आहे तेच घर रस्त्याच्या जागेवरून बाजूला सरकवून घेण्याचा निर्णय घेतला. हे घर त्यांना 500 फूट अंतरावर सरकवून घ्यावे लागणार आहे.

First published:

Tags: Home-decor, Live video viral