पन्ना (मध्यप्रदेश), 29 ऑगस्ट: ते म्हणतात ना कोणाचं नशीब कधी बदलेल काहीच सांगता येत नाही. आपल्या नशिबात असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकते. माणूस गरिबीच्या परिस्थीतूनही श्रीमंत होऊ शकतो. अशीच एक घटना मध्यप्रेदशच्या (Madhya Pradesh) पन्ना जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासोबत घडली (Viral story) आहे. या शेतकऱ्याला आपल्या शेतातील खोदकामात गेल्या दोन वर्षांमध्ये जे हाती लागलं आहे ते अद्भुत आहे.
या शेतकऱ्यानं मध्यप्रदेश सरकारकडून एक शेतजमीन लीजवर घेतली होती. मात्र आता त्याला त्या जमिनीच्या उत्खननात उच्च दर्जाचा तब्बल 6.47 कॅरेट हिरा (Diamond) सापडला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला (Farmer found diamond while digging) एका दोनदा नाही तर गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल 6व्यांदा हिरा सापडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचं नशीब म्हणावं की लागलेली लॉटरी असा प्रश्न पडला आहे.
हे वाचा - मंडपात नाही तर थेट स्मशानभूमीत पोहोचली नवरी; ही Love Story वाचून पाणावतील डोळे
स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांप्रमाणे, हा 6.47 कॅरेटचा हिरा आगामी काळात लिलावात (Auction) विक्रीसाठी ठेवला जाईल आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार किंमत निश्चित केली जाईल. या लिलावातून मिळणारी रक्कम हा शेतकरी आणि त्याचे चार साथीदार वाटून घेऊ शकतील,
विशेष म्हणजे या शेतकऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना या आधीही अनेकदा 2 आणि 2.5 कॅरेटचे हिरे सापडले आहेत. हे हिरेही लिलावात ठेवले जाणार आहेत. त्यामुळे एका क्षणात या शेतकऱ्यांचं संपूर्ण आयुष्याचं बदलून जाणार आहे. अंदाजानुसार, लिलावात 6.47 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत सुमारे 30 लाख रुपये असू शकते. कच्च्या हिऱ्याचा लिलाव केला जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम सरकारी रॉयल्टी आणि कर कापल्यानंतर शेतकऱ्याला दिली जाईल.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.