मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंकडून फास्ट बॉलर्सना अशी वागणूक, पाहा फ्लाईटमध्ये काय घडलं?

T20 World Cup: टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंकडून फास्ट बॉलर्सना अशी वागणूक, पाहा फ्लाईटमध्ये काय घडलं?

टीम इंडिया अॅडलेडमध्ये दाखल

टीम इंडिया अॅडलेडमध्ये दाखल

T20 World Cup: टीमच्या सीनिअर्सनी आपल्या वागणुकीतून युवा खेळाडूना एक आदर्श घालून द्यायचा असतो. अगदी तसंच काहीसं मेलबर्न ते अ‍ॅडलेड या प्रवासादरम्यान घडलंय.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  अ‍ॅडलेड, 08 नोव्हेंबर: सध्या संपूर्ण क्रिकेटजगताचं लक्ष टी-20 विश्वचषकाच्या दोन्ही सेमी-फायन्सलकडे लागलं आहे. 2022चा टी-20 विश्वचषक कोण जिंकेल याबाबत अनेक कयास लावले जात आहेत. टीम इंडियाने सांघिक कामगिरी करत सेमी-फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सेमी-फायनल मॅच होणार आहे. मेलबर्नमध्ये झिंबाब्वेविरुद्धचा सामना जिंकल्यावर टीम इंडिया सेमी-फायनलसाठी अ‍ॅडलेडमध्ये पोहोचली आहे. टीमच्या सीनिअर्सनी आपल्या वागणुकीतून युवा खेळाडूना एक आदर्श घालून द्यायचा असतो. अगदी तसंच काहीसं मेलबर्न ते अ‍ॅडलेड या प्रवासादरम्यान घडलंय. टीम इंडियाच्या सीनिअर मेंबर्सनी फ्लाइटच्या बिझनेस क्लासच्या सीट्स टीममधल्या फास्ट बॉलर्सना दिल्या. जाणून घेऊ या नक्की काय घडलं.

  रोहित-राहुलचा दिलदारपणा

  यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतल्या टीम इंडियाच्या यशात बॅटसमन्सप्रमाणे बॉलर्सनीही महत्त्वाची भूमिका बजावली. 10 नोव्हेंबरला होणार्‍या सेमी-फायनलसाठी टीम इंडिया मेलबर्नहून फ्लाइटने अ‍ॅडलेडला येत होती. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, माजी कॅप्टन विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बिझनेस क्लासची तिकिटं होती. परंतु, या तिन्ही सीनिअर्सनी आपल्या सीट्स टीममधल्या फास्ट बॉलर्सना दिली. यातून त्यांची टीमबद्दल असलेली आत्मीयताच दिसून आली. या फास्ट बॉलर्सचा प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी त्यांनी आपल्या बिझनेस क्लासमधल्या सीट्स त्यांना दिल्या. त्यांच्या या कृतीतून दिला गेलेला मेसेज सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय.

  हेही वाचा - Ind vs Eng: टीम इंडियाला फायनलमध्ये घेऊन जाणार हा बॉलर? प्रत्येक 11 बॉलनंतर घेतोय विकेट

  मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या अशा चारही फास्ट बॉलर्सनी चांगली कामगिरी केली आहे. अशा मोठ्या स्पर्धांमध्ये सतत बॉलिंग केल्याने शरीरावर आणि मनावर ताण येतो. तसंच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना होणारा प्रवासही दगदगीचा होतो. याचा विचार करून त्यांना आराम मिळावा आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी सीनिअर्सनी आपल्या सीट्स त्यांना दिल्या.

  आयसीसीकडून प्रवासासाठी हा नियम...

  खेळाडूंच्या प्रवासाबद्दलही आयसीसीचे काही नियम आहेत. कुठल्याही आयसीसीच्या स्पर्धांमध्ये प्रत्येक टीमच्या चौघांना विमानाच्या बिझनेस क्लासने प्रवास करण्याची सोय असते. बहुतांश वेळा टीमचे प्रशिक्षक, कॅप्टन, व्हाइस कॅप्टन आणि सीनिअर प्लेयर्सनाच या सीट दिल्या जातात. अशा वेळी टीम इंडियासाठी ज्या चार सीट मिळाल्या, त्या संघ व्यवस्थापनाने बॉलर्सना देण्याचं ठरवलं.

  सुपर 12 च्या एकूण मॅचेसमध्ये प्रत्येक टीम 5 मॅचेस खेळली. त्यानुसार, टीम इंडिया 5 मॅचेस खेळली; पण या पाचही मॅचेस ऑस्ट्रेलियातल्या विविध शहरांत होत्या. यामुळे प्रत्येक मॅचनंतर टीम इंडियाला प्रवास करणं आवश्यक होतं. टीम इंडियाच्या मॅचेस मेलबर्न, सिडनी, पर्थ आणि अ‍ॅडलेड अशा चार ठिकाणी झाल्या.

  टीम इंडियाच्या यशात बॉलर्सचा मोठा वाटा

  सांघिक कामगिरीच्या या खेळात इंडियन बॉलर्सचाही महत्त्वाचा वाटा आहे. बॉलर्सनी केलेल्या कामगिरीमुळे टीम इंडियाने काही मॅचेसमध्ये विजय खेचून आणला. टीम इंडियाच्या बॉलर्सची या स्पर्धेतली कामगिरी उल्लेखनीय आहे. अर्शदीप सिंहने 10, हार्दिक पंड्याने 8, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 6, भुवनेश्वर कुमारने 4, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

  सेमी फायनल लढती

  न्यूझीलंड वि. पाकिस्तान

  पहिली सेमी फायनल, सिडनी

  9 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता

  भारत वि. इंग्लंड

  दुसरी सेमी फायनल, अ‍ॅडलेड

  10 नोव्हेंबर, दुपारी 1:30 वाजता

  First published:
  top videos

   Tags: Sports, T20 world cup 2022