जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! मुलीसाठी जेवण बनवताना डोक्याला अन् भुवयांना लागली आग; पाहा पुढे काय झालं

Shocking! मुलीसाठी जेवण बनवताना डोक्याला अन् भुवयांना लागली आग; पाहा पुढे काय झालं

Shocking! मुलीसाठी जेवण बनवताना डोक्याला अन् भुवयांना लागली आग; पाहा पुढे काय झालं

जिम्मी किम्मेल यांनी या डिशचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘बर्न्ट हेअर स्मोक्ड टर्की.’ त्यांनी आपला जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यात त्यांची अवस्था पाहायला मिळते

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : आगीमध्ये जेवण बनवताना (Making Food) अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. अन्यथा अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. हॉलिवूड स्टार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट जिम्मी किम्मेललाही (Jimmy Kimmel) हीच बाब महागात पडली. त्यांनी आपल्या मुलीसाठी थँक्सगिविंग डेच्या (Thanksgiving Day) निमित्ताने जेवण बनवण्याचा विचार केला. मात्र यादरम्यान त्यांच्या केसांला आणि भुवयांनाच आग लागली. जिम्मी आपल्या मुलीसाठी अतिशय खास डिश बनवत होते. जिम्मीने त्या डिशचा फोटोही शेअर केला. ही डिश बनवत असताना त्यांच्यासोबत ही भयंकर दुर्घटना घडली. तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे त्यांच्या डोक्याचे, भुवयांचे आणि हाताचे केस जळाले आहेत. पाहून असं वाटतं की ते एखाद्या गंभीर घटनेत जखमी झाले आहेत. जिम्मी किम्मेल यांनी या डिशचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘बर्न्ट हेअर स्मोक्ड टर्की.’ त्यांनी आपला जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यात त्यांची अवस्था पाहायला मिळते. आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन त्यांनी जो फोटो शेअर केला आहे त्यात त्यांनी आपल्या डोक्यावर कॅप घातली आहे. फोटोमध्ये ते हसताना दिसत असले तरी त्यांच्या डोक्याचे केस भरपूर प्रमाणात जळालेले आहेत. यासोबतच त्यांच्या हाताचे केसही जळलेले दिसतात. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, थँक्सगिविंगच्या शुभेच्छा. ओवनचा वापर करताना आपले केस आणि भुवया जळण्यापासून वाचवा. 54 वर्षीय जिम्मी किम्मेल Jimmy Kimmel Liveया आपल्या शोमुळे चर्चेत असतात.

जाहिरात

जिम्मी किम्मेल यांनी जेव्हा हा फोटो शेअर केला तेव्हा त्यांची मुलगी कॅटी किम्मेलने कमेंट करत विचारलं, पुन्हा? मुलीची कमेंट पाहून असं वाटतं की याआधीही जिम्मी जेवण बनवत असताना अशा दुर्घटनेला सामोरे गेले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात