मराठी बातम्या /बातम्या /Viral /प्रसिद्ध फूटबॉलर -19 डिग्री तापमानातही फिरतोय शर्टलेस, Video पाहून अंगावर येईल काटा

प्रसिद्ध फूटबॉलर -19 डिग्री तापमानातही फिरतोय शर्टलेस, Video पाहून अंगावर येईल काटा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सध्या हिवाळा सुरु असून काही ठिकाणी लोकांना बाहेर पडणंही अवघड झालंय. थंडीचा जोर पाहून अनेकजण बाहेर जाणं टाळत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 19 जानेवारी : सध्या हिवाळा सुरु असून काही ठिकाणी लोकांना बाहेर पडणंही अवघड झालंय. थंडीचा जोर पाहून अनेकजण बाहेर जाणं टाळत आहेत. बऱ्याच ठिकाणी स्वेटर, कोट गरम कपडे घालूनही आराम मिळत नाही. तोच दुसरीकडे एका व्यक्तीने शर्टलेस होऊन बर्फवृष्टी होत असलेला पर्वत चढला आहे. एवढ्या थंडीत बर्फ पडत असलेल्या ठिकाणी पर्वत चढताना व्हिडीओ या तरुणाने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत असून याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जर्मनीचा 32 वर्षीय प्रसिद्ध फुटबॉलपटू अॅंड्रे स्करलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाच जण बर्फाच्छदित पर्वतावर चढत आहेत. विशेष म्हणजे एवढ्या बर्फाळ प्रदेशात, एवढ्या थंडीमध्ये ते शर्टलेस फिरत आहेत. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एकूण पाच जण दिसत असून पाचपैकी फक्त एकानेच स्वतःचं शरीर झाकलं आहे. बाकी चार जणांनीही शर्टलेस होत पर्वत गाठल्याचं दिसत आहे.

अॅंड्रे स्करलने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आंद्रेने 19 अंश तापमानात जोरदार बर्फवृष्टी होत असलेल्या ठिकाणी चढाई केली. हा ट्रेक प्रेरक आणि अॅथलिट विम हॉफ यांनी सुरू केलेल्या आव्हानाशी संबंधीत आहे. अॅंड्रेने याविषयी सांगितलं की हा ट्रेक आत्तापर्यंतचा सर्वात कठिण ट्रेक होता. त्याने सांगितलं, माझ्या सुंदर क्रुसोबत आइसमॅन हॉफच्या अनुभवाचा तिसरा दिवस. मी आत्तापर्यंत केलेली कठिण गोष्ट आहे. मानसिक आणि शारीरीकदृष्ट्याही. अॅंड्रेचा हा व्हिडीओ सध्या जोरदार वहायरल होत असून व्हिडीओवर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, जर्मनीचा फुटबॉलपटू अॅंड्रे स्करलने वयाच्या 30 व्या वर्षी आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या या निर्णयाने अनेकांनी धक्काच बसला होता. त्याचे चाहतेही दुःखी झाले होते. अॅंड्रेने 2014 मध्ये जर्मनीला विश्वचषक जिंकून दिला होता. आता तो निवृत्त झाला असला तरी त्याचा चाहता वर्ग काही कमी झालेला नाही. तो सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असतो.

First published:

Tags: Football, Top trending, Viral, Viral news, Viral videos