लखनऊ, 05 सप्टेंबर : अॅम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायिनीच असते. पण याच अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने एका प्रेग्नंट महिलेसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. फक्त हजार रुपयांसाठी या ड्रायव्हरने या महिलेसोबत असं काही केलं आहे, की त्याबाबत संताप व्यक्त केला जातो आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या हरिमपूरमधील पंधरी गावातील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओत रस्त्याच्या कडेला एक प्रेग्नंट महिला बसलेली असल्याचं दिसतं आहे. तिला प्रसूती वेदना होत आहेत. तिचे नातेवाईक तिला आधार देताना दिसत आहेत. तर पुढे एक अॅम्ब्युलन्स तिथून जाताना दिसते आहे. आता ही अॅम्ब्युलन्स या महिलेला घेऊन जाईल असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात वेगळंच काही घडतं. ही अॅम्ब्युलन्स त्या महिलेला न्यायला नव्हे तर तिला सोडून जाते आहे. हे वाचा - महिला पोलिसाकडून सासऱ्याला बेदम मारहाण; पोलिसांसमोरच वृद्धाला कानशिलात लगावल्या, Shocking Video अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरने तशाच अवस्थेत रस्त्यावर सोडल्याचं सांगितलं जातं आहे. याचं कारण म्हणजे त्याने या महिलेच्या कुटुंबाकडे केलेली पैशांची मागणी. जे ते कुटुंब पूर्ण करू शकलं नाही.
यूपी में एंबुलेस कंपनी और उनके ड्राइवरों की बदमाशी कौन नहीं जानता।
— Rajesh Sahu (@askrajeshsahu) September 6, 2022
ये वीडियो हमीरपुर के पंधरी गांव का है। परिवार के पास देने के लिए 1000 नहीं थे इसलिए गर्भवती महिला को सड़क पर ही छोड़ दिया।
इतने निर्मम लोगों हैं कि क्या ही कहा जाए। pic.twitter.com/So8OKthLsP
राजेश साहू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. माहितीनुसार या रुग्णवाहिका चालकाने महिलेच्या कुटुंबाकडे 1000 मागितले. तरच रुग्णालयात पोहोचवू असं सांगितलं. पण कुटुंबाकडे तितके पैसे नव्हते, त्यामुळे ते चालकाला तितके पैसे देऊ शकले नाही. म्हणून त्याने प्रेग्नंट महिलेला रस्त्यात सोडलं आणि तो तिथून निघून गेला. हे वाचा - VIDEO: बालाजीच्या दर्शनासाठी अभिनेत्रीचा राडा; 10 हजार मागितले अन् नको तिथं स्पर्श केल्याचे गंभीर आरोप हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. या अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.