नवी दिल्ली 06 सप्टेंबर : दिल्ली पोलिसांच्या एका महिला उपनिरीक्षकावर वृद्ध सासऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण लक्ष्मीनगर भागातील आहे. यात महिला उपनिरीक्षकाने स्थानिक पोलिसांसमोर वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण केली. स्थानिक पोलीस प्रेक्षक बनून हे सर्व बघत राहिले, पण कोणतीही कारवाई केली नाही. मारहाणीची ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बायको, पोरांना बोलावून बसचालक आणि वाहकासह तिघांना मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार
आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला पोलिसाचं आणि तिच्या वृद्ध सासू सासऱ्यांच्या वादावरील प्रकरण न्यायालयात सुरू आहे. रविवारी अचानक महिला पोलीस तिच्या आईसह सासरच्या घरी पोहोचली. तिथे तिने सासरच्या मंडळींना विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी महिला वृद्धाला कशी चापट मारत आहे. तिने एकापाठोपाठ एक आपल्या सासऱ्याला चापटी लगावल्या.
#WATCH | Case registered under section 323/427 IPC after a video of Sub-Inspector thrashing her in-laws in Delhi's Laxmi Nagar went viral. Info shared with concerned authority to take suitable departmental action against the erring police official: Delhi Police
(CCTV Visuals) pic.twitter.com/VUiyjVtZQl — ANI (@ANI) September 5, 2022
यावेळी स्थानिक पोलीसही तेथे उपस्थित होते. पण लेडी सब इन्स्पेक्टरला कोणी काहीच बोललं नाही. सगळेजण वृद्धाला होणारी मारहाण पाहात राहिले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.
ATM मध्ये पैसे भरण्यासाठी आलेली गाडी; कर्मचारी उतरताच कॅश व्हॅन घेऊन चालक फरार, मुंबईतील घटना
याआधी दिल्लीतील आनंद विहार पोलीस ठाण्यातील व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काही तरुण पोलीस ठाण्यात घुसून पोलिसाला मारहाण करताना दिसत होते. तरुण जेव्हा पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत होते तेव्हा इतर पोलीस हे सर्व बघत होते. तर काही लोक त्याचा व्हिडिओ बनवत होते. यावेळी मार खाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने तरुणांची माफीही मागितली, तरीही ते त्याला मारहाण करत राहिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking video viral