जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मुलगा झाल्याच्या आनंदात वाटली मिठाई; पण नंतर DNA टेस्टची आली वेळ, हैराण करणारी घटना

मुलगा झाल्याच्या आनंदात वाटली मिठाई; पण नंतर DNA टेस्टची आली वेळ, हैराण करणारी घटना

बाळ बदलल्याचा कुटुंबीयांचा आरोप

बाळ बदलल्याचा कुटुंबीयांचा आरोप

ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी देवेंद्रला मुलगा झाल्याची माहिती दिली. मुलाच्या जन्माच्या आनंदात कुटुंबात जल्लोष झाला. कर्मचाऱ्यांना एक हजार बक्षीस देण्यात आलं

  • -MIN READ Local18 Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 22 जून : बस्ती मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या ओपेक हॉस्पिटल कॅलीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. लालगंज पोलीस ठाण्याचे देवेंद्र कुमार पत्नीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचले होते. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. पत्नीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी देवेंद्रला मुलगा झाल्याची माहिती दिली. मुलाच्या जन्माच्या आनंदात कुटुंबात जल्लोष झाला. कर्मचाऱ्यांना एक हजार बक्षीस देण्यात आलं. तसंच संपूर्ण रुग्णालयात मिठाईचं वाटप करण्यात आलं. सर्व नातेवाईकांना फोनवरून मुलगा झाल्याची माहिती देण्यात आली. सर्वजण आनंद साजरा करू लागले. ऑपरेशन थिएटरमधून मुलाला कापडात गुंडाळून नातेवाइकांच्या स्वाधीन केलं असता वेगळंच सत्य समोर आलं. डोळ्यांच्या उलट्या पापण्या, जन्मताच दात आले अन्…; बाळाला पाहताच डॉक्टरांनाही फुटला घाम नातेवाइकांनी मुलाच्या अंगावरील कापड काढले असता मुलाऐवजी मुलगी दिसली. मग काय, हॉस्पिटलमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाळ बदलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मुलगा झाला असल्याचं त्यांना सांगण्यात आल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. टीप म्हणून हजारो रुपयेही घेतले, पण नंतर मुलाची जागा मुलीने घेतली. जो कागद बनवला होता तो मुलाचा होता. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी नातेवाईकांनी मुलीला सोबत नेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मुलीची डीएनए चाचणी होत नाही तोपर्यंत ते तिला घरी घेऊन जाणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, कॅलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन. नारायण प्रसाद यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत सांगितलं की, तक्रारदाराने सांगितलं की, त्यांना प्रथम मुलगा झाल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु नंतर मुलगी मिळाली. मी माझ्या स्तरावर तपासणी केली आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात