नवी दिल्ली, 20 जानेवारी- कोरोनापासून (corona virus) सुरक्षित राहण्यासाठी मास्क (mask) घालणं खूपच आवश्यक आहे. लोक सतर्क रहावेत आणि घराबाहेर पडताना त्यांनी मास्क घालावा यासाठी दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. परंतु यादरम्यान डिस्पोजेबल(Disposable surgical mask) मास्कबद्दल उलट-सुलट बोललं जात आहे (Fake video viral).
एका व्हिडिओमध्ये बनावट दावा करण्यात आला आहे की, डिस्पोजेबल सर्जिकल मास्कमध्ये (Disposable surgical mask) किडे (Insects) आढळत आहेत. डिस्पोजेबल सर्जिकल मास्क सिंगल यूजसाठी असतो. तो धुवून पुन्हा वापरता येत नाही.
एक वीडियो में फर्जी दावा किया जा रहा है कि डिस्पोजेबल सर्जिकल मास्क में कीड़े होते हैं#PIBFactCheck
▶️वैज्ञानिक मानकों के अनुसार तैयार किए गए किसी भी मास्क में कीटाणु नहीं होते हैं ▶️कोरोना से बचाव के लिए नाक और मुँह को सही से ढकने वाले किसी भी मास्क का प्रयोग किया जा सकता है pic.twitter.com/MyXCOkf32y — PIB Fact Check (@PIBFactCheck) January 19, 2022
डिस्पोजेबल सर्जिकल मास्कबद्दलच्या अफवा
डिस्पोजेबल सर्जिकल मास्क हे आजाराचे घर असल्याचं एका बनावट व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे. यामध्ये काळे बारीक किडे असतात, ते श्वास घेताना नाकावाटे शरीरात प्रवेश करतात, असं बोललं जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मास्कमुळे होत असल्याचं सांगितलं जात आहे. आपण स्वतः यावर रिसर्च केल्याचा दावा एक व्यक्ती व्हिडिओमध्ये करत आहे.
भ्रामक व्हिडिओ व्हायरल करू नका
एवढेच नव्हे, या व्हिडिओमध्ये डिस्पोजेबल मास्क जाळण्यात येत असल्याचं दिसत आहे. तसंच मास्क घालू नका असंही सांगितलं जात आहे. परंतु आम्ही सांगू इच्छितो की हे अजिबातच खरे नाही. हा भ्रामक व्हिडिओ आहे. कोणत्याही मास्कमध्ये किडे नसतात. वैज्ञानिकांच्या निकषांनुसार कोणत्याही बनवलेल्या मास्कमध्ये किडे नसतात. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नाक आणि तोंड झाकण्यासाठी कोणताही मास्क घालणे आवश्यक आहे. (PIB Fact Check) या सरकारी एजन्सीनेसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बनावट असल्याचं म्हटलं आहे. असे व्हिडिओ शेअर करू नका आणि नेहमी मास्क वापरा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Face Mask, PIB