Home /News /viral /

दहावीच्या परीक्षेत 55 वेळा नापास, उत्तीर्ण होताच 77 वर्षीय व्यक्तीचा नवा कारनामा!

दहावीच्या परीक्षेत 55 वेळा नापास, उत्तीर्ण होताच 77 वर्षीय व्यक्तीचा नवा कारनामा!

दोन वा तीन वेळेस नाही तर या व्यक्तीने चिकाटी सोडली नाही आणि 55 वेळा नापास होऊन 56 व्या वेळास यश मिळवलं,

    जयपूर, 13 जानेवारी : इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नसतं, याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राजस्थानमधील (Rajasthan) ही व्यक्ती. त्यांनी हे सिद्ध केलं की, कोणतंही स्वप्न पूर्ण करण्याचं वय नसतं. जालोरचे (Jalore)  77 वर्षीय रिटायर्ड सरकारी कर्मचारी हुकुमदास वैष्णव (Hukumdas Vaishnav), यांनी 55 वेळा दहावीची परीक्षा दिली. आता ते बारावीची परीक्षा देऊ इछ्चितात. वैष्णव यांनी 56 व्या प्रयत्नात दहावीची परीक्षा पास केली. 70 च्या दशकापासून अभ्यास करणाऱ्या या व्यक्तीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 1945 मध्ये जन्माला आलेल्या हुकुमदास यांनी 55 वेळा दिली 10 वीची परीक्षा जालोरच्या (Jalore) सरदारगड गावात 1945 मध्ये जन्माला आलेल्या हुकुमदास यांनी तीखी गावातून (Teekhi Village) पहिली ते आठवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 1962 मध्ये पहिल्यांदा बाडमेरच्या केंद्रातून त्यांनी दहावीची परीक्षा दिली. येथे ते नापास झाले. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना आव्हान दिलं होतं की ते कधीच दहावीची परीक्षा पास होऊ शकणार नाही. त्यांनी आपला प्रयत्न सुरू ठेवला. त्यांनी तब्बल 55 वेळा दहावीची परीक्षा दिली. हे जितकं सोपं वाटतं तितकं नाहीये याची जाणीव सर्वांनाच आहे. आपल्याकडे दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर लोक ती वाटच सोडून देतात. मात्र हुकुमदास यांनी कोणाचीही पर्वा केली नाही आणि आपला प्रयत्न सुरू ठेवला. हे ही वाचा-Exam Tips: कोणतीही परीक्षा देण्याआधी का सोडवावेत सॅम्पल पेपर्स? वाचा फायदे 2019 मध्ये 10 वीची परीक्षा पास हुकुमदास वैष्णव (Hukumdas Vaishnav) म्हणाले की, ते भू-जल विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. नोकरीत रुजू झाल्यानंतर त्यांनी नियमित अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे ते बाहेरून परीक्षा देत होते. 2005 मध्ये ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी असताना ट्रेजरी विभागातून निवृत्त झाले. 2010 पर्यंत त्यांनी 48 वेळा प्रयत्न केला होता. यानंतरही ते आपला प्रयत्न करीत राहिले. शेवटी 2019 मध्ये ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांनी 2021-22 वर्षात बारावीचा फॉर्म भरला आणि आता ते बारावीची परीक्षा देणार आहेत. मजेशीर म्हणजे त्यांच्या नातवानेही शाळेचं शिक्षण पूर्ण केलं असून तोदेखील कॉलेजमध्ये नाव नोंदवणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: 10th class, Education, Rajasthan

    पुढील बातम्या