जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Ajab Gajab : जोरदार वारा सुटल्यास हलू लागतो टॉवर; स्टॅनवे टॉवरची खास वैशिष्ट्यं माहितीय?

Ajab Gajab : जोरदार वारा सुटल्यास हलू लागतो टॉवर; स्टॅनवे टॉवरची खास वैशिष्ट्यं माहितीय?

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

जगातली सर्वांत बारीक इमारत अमेरिकेत मॅनहॅटन इथं आहे. या इमारतीचं नाव स्टॅनवे टॉवर असून, तिची उंची 1428 फूट आहे. हा टॉवर एवढा बारीक आहे, की जोरात वारा सुटला तर तो हलू लागतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 28 डिसेंबर :  जगभरात वास्तुकलेचे अद्भुत आविष्कार अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. बुर्ज खलिफा असो अथवा मॅनहॅटनमधला स्टॅनवे टॉवर… या आजच्या काळातल्या अद्भुत वास्तू म्हणता येतील. अशा वास्तू पाहणं किंवा त्या ठिकाणी राहणं हा खरोखर रोमांचक अनुभव असतो. स्टॅनवे टॉवर ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहे. ही वास्तू जगातली आकाराने सर्वांत बारीक मानली जाते. जोरात वारा सुटला तर हा टॉवर अक्षरशः हलू लागतो; पण विशेष म्हणजे हा टॉवर हलला, तरी त्याची जाणीव तिथे राहणाऱ्यांना होत नाही. अशा या खास टॉवरविषयी सविस्तर जाणून घेऊ या. जगातली सर्वांत बारीक  इमारत अमेरिकेत मॅनहॅटन इथं आहे. या इमारतीचं नाव स्टॅनवे टॉवर असून, तिची उंची 1428 फूट आहे. हा टॉवर एवढा बारीक आहे, की जोरात वारा सुटला तर तो हलू लागतो. ताशी 100 मैल वेगानं वारा सुटला तर हा टॉवर हवेत हलू शकतो; पण असं घडल्याची जाणीव टॉवरमध्ये राहणाऱ्यांना होत नाही, असं 2015 मध्ये या टॉवरचा इंजिनिअर रॉवन विलियम्स डेव्हिस याने म्हटलं होतं. हा टॉवर 84 मजली आहे. मॅनहॅटन पश्चिममधल्या 57 स्ट्रीट इथे असलेला हा स्टॅनवे टॉवर उभारण्यासाठी 15 हजार कोटी रुपये खर्च आला. हा टॉवर निवासी प्रकल्प म्हणून उभारला गेला; मात्र सध्या हा टॉवर त्याच्या खास बांधकामशैलीमुळे नाही, तर अमेरिकेत होत असलेल्या हिमवृष्टीमुळे चर्चेत आहे. हा टॉवर बांधण्यासाठी सुमारे नऊ वर्षं लागली. हा टॉवर मजबूत काँक्रीटने बांधला गेला आहे. या टॉवरमध्ये घर बुक केलेल्या ग्राहकांना नुकतंच पझेशन देण्यात आलं आहे. या टॉवरचं इंटिरीअर अत्यंत लक्झुरियस असून ते सर्वांनाच आकर्षित करतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    या टॉवरचं डिझाइन 1925मध्ये तयार करण्यात आलं होतं. हा टॉवर जेडीएस डेव्हलपमेंट, प्रॉपर्टी मार्केट्स ग्रुप आणि स्प्रूस कॅपिटल यांनी एकत्रित येऊन बांधला आहे. स्टॅनवे टॉवरच्या उंची-रुंदीचे प्रमाण 24:1 असं असल्याचं डेव्हलपरने सांगितलं. या टॉवरमधल्या एका स्टुडिओ अपार्टमेंटची किंमत 7.75 दशलक्ष डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 64 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तिथल्या पेंटहाउसची किंमत 66 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे साडे पाच अब्ज रुपये आहे. एकूणच वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि खास इंटिरीअरमुळे स्टॅनवे टॉवर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात