मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Fact Check गूळ तुमच्या चहाला शुगर फ्री बनवतो? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा सविस्तर

Fact Check गूळ तुमच्या चहाला शुगर फ्री बनवतो? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा सविस्तर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तज्ज्ञांच्या मते गूळ हा उसापासून बनवलेल्या आहाराचा एक प्रकार आहे. त्यात सुमारे 65-70 टक्के सुक्रोज असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 25 जानेवारी : गूळ हा पारंपारिक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. सुरुवातीच्या काळी घरी आलेल्या पाहुण्याना गुळ आणि पाणी दिलं जायचं, वेळे प्रमाणे प्रथा तर बदलली शिवाय माणसाच्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले. अनेक भारतीय पाककृतींमध्ये गुळ वापरला जातो. प्राचीन काळापासून गुळाचा वापर केवळ स्वयंपाक घरातच नाही तर आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो.

साखरेसाठी देखील गूळ हा आरोग्यदायी पर्याय मानला जातो. पण खरा प्रश्न असा आहे की साखरेला गूळ हा खरोखरच चांगला पर्याय आहे का? साखरेपेक्षा ती अधिक नैसर्गिक आहे असे आपल्याला का वाटते? चला जाणून घेऊ माहिती.

हे ही पाहा : भूत, प्रेत की आणखी काही? CCTV मध्ये लोकांना दिसली अशी गोष्ट Video पाहून फुटेल घाम

तज्ज्ञांच्या मते गूळ हा उसापासून बनवलेल्या आहाराचा एक प्रकार आहे. त्यात सुमारे 65-70 टक्के सुक्रोज असते, तर पांढर्‍या साखरेत 99.5% सुक्रोज असते. डॉ निगम सांगतात की पांढऱ्या साखरेच्या तुलनेत गुळात कमी सुक्रोज असते, त्यामुळे त्याचे सेवन केल्यानंतर ग्लुकोजची पातळी हळूहळू वाढते.

रक्तातील साखरेच्या पातळीवर गुळाचा परिणाम रिफाइंड साखरेसारखा असू शकत नाही, परंतु ग्लायसेमिक इंडेक्स नावाच्या महत्त्वाच्या घटकामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे साखर तर शरीरासाठी चांगली नाहीच.

रक्तातील साखरेवर गूळ आणि साखर यांच्या परिणामांची तुलना करणार्‍या अभ्यासात समान नमुने आढळून आले. परंतू गुळातील प्रथिनांचे प्रमाण उसाच्या साखरेपेक्षा जास्त होते. पण असं असलं तरी या अभ्यासात मधुमेहींसाठी साखरेला चांगला पर्याय म्हणून गुळाची शिफारस करण्यात आली नाही.

गूळ हा अनेक भारतीय पारंपारिक पदार्थांचा एक भाग आहे. ऊसाचे जास्त उत्पादन आणि उच्च पौष्टिकता यामुळे आपल्या घरात गुळाला नेहमीच पसंती दिली जाते.

गूळ हा अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त आहे, विशेषत: लोह आणि व्हिटॅमिन सीचा तो एक चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन बी 12 ने समृद्ध गुळ देखील बाजारात सहज उपलब्ध आहे. तुम्ही तो देखील खाऊ शकता. तसेच सेंद्रिय गुळ हा देखील शरीरासाठी खूपच चांगला मानला जातो.

First published:

Tags: Health Tips, Social media, Sugar facrtory, Top trending, Viral