मुंबई 27 सप्टेबर : तुम्ही डुकरांना पाहिलं असेल, ते बऱ्यचदा चिखलाने माखलेले किंवा चिखलातच लोळताना दिसतात. ज्यामुळे आपल्याला त्यांची घाण वाटते, पंरतू तुम्ही कधी असा विचार केलाय की ते चिखलातच का राहातात? खरंतर या मागे एक शास्त्रीय कारण आहे, जे बऱ्याच लोकांना ठावूक नाहीय, चला याबद्दल जाणून घेऊ. खरंतर आपल्याला जेव्हा गरम होतं, तेव्हा आपल्याला घाम येतो आणि आपलं शरीर थंड होऊ लागतं, परंतू डुकरांना घामाच्या ग्रंथी नसतात, त्यामुळे त्यांना घाम येत नाही. मग आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी त्यांना चिखलात जावं लागतं. आज आम्ही तुम्हाला डुकरांबद्दल 5 अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहित नसाव्यात. अनेकदा आपण पाहतो की डुक्कर हे अतिशय घाणेरडे प्राणी असतात, पण एका अहवालानुसार डुकर हे स्वच्छ प्राणी आहेत. ते जेथे झोपतात तेथे ते कधीच शौच करत नाहीत, तसेच त्यांना आवडेल तेव्हाच ते खातात. अगदी नवजात डुकरांनाही हे माहित असतं. डुकरांना घाम येत नाही. डुकरांना जास्त घामाच्या ग्रंथी नसतात, म्हणून ते चिखलात झोपतात आणि थंड राहण्यासाठी पाण्यात पोहतात. चिखलात राहण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे डुकराच्या त्वचेचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. डुकरांना मानवी मुलासारखी बुद्धी असते आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा बुद्धिमान प्राणी म्हणून त्याची नोंद आहे. खरं तर, डुक्कर इतर कोणत्याही जातीच्या कुत्र्यांपेक्षा अधिक हुशार आणि प्रशिक्षित असतात. ते फक्त दोन आठवड्यांत त्यांचे नाव शिकतात आणि जेव्हा त्यांना बोलावलं जातं तेव्हा ते लगेच येतात. मादी डुकर आपल्या बाळाला दूध पाजताना गातात. नवजात डुक्कर त्यांच्या आईच्या आवाजाने धावत येतात आणि डुक्कर सतत एकमेकांशी संवाद साधतात. त्याच्याकडे 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ग्रंट्स आणि स्क्वल्स आहेत ज्यांची ओळख पटली आहे. भूक व्यक्त करण्यापासून ते कोणाला आपल्या सोबतीला बोलावण्यापर्यंत ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. तुम्ही डुगरांना नेहमीच ग्रुपमध्ये किंवा एकत्र राहाताना पाहिलं असेल, खरंतर डुकरांना एकमेकांशी जोडलेले राहणे आवडते. त्यामुळे ते कधीही एकटे झोपत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.