मुंबई, 09 मे : उन्हाळा म्हटलं की नारळपाणी आलंच. उन्हाळ्यात थंड आणि गोड असं नारळपाणी प्यायल्याने आपली तहान भागते आणि बरंही वाटतं. नारळपाणी पिण्याचे आरोग्यालाही बरेच फायदे आहेत. पण तरी नारळपाणी प्यायल्यानंतर तुम्हाला जीवघेण्या आजाराचा धोका आहे. नारळपाणी पिताना एक छोटीशी चूक यासाठी कारणीभूत ठरते. याचा एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होतो आहे.` शहाळ्याचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. शहाळ्यात असं काही असू शकतं, याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. एकप्रकारे या मृत्यूच होता, असं म्हणावं लागेल. तुम्हाला फक्त सांगून विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हिडीओ पाहा. ज्यात शहाळ्याच्या आतील पाणी एका भांड्यात ओतण्यात आलं. पाण्याचा रंग बदलला आहे आणि त्यात कित्येक अळ्या दिसत आहेत. व्हिडीओ पाहूनच आपल्या अंगावर काटा येतो. शहाळ्याच्या पाण्यातील या अळ्या डासांच्या अळ्या आहेत. जे असे आजार पसरवतात ज्यामुळे जीवही जातो.
उन्हाळ्यात डासांची संख्या वाढते. यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया असे आजार पसरतात. हे आजार जीवही घेऊ शकतात. आता या आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत ती ही शहाळं. उन्हाळ्यात माठातील पाणी पिताय सावधान! 2 दिवसांत होते अशी अवस्था; Shocking Video डासांची पैदास होण्यासाठी लागतं ते एका जागेवर साचलेलं पाणी. त्यामुळे घरातील भांड्यातील पाणी वारंवार बदलत राहावं असा सल्ला दिला जातो. कारण डास अशा पाण्यात अंडी घालतात आणि तिथं डासांची पैदास होते. आता शहाळ्यातही पाणी असतं. काही लोक हे पाणी पूर्णपणे न पिता शहाळं तसंच फेकून देतात. शहाळ्याचा वरील भाग खुला असल्याने डास आत जातात आणि त्यात अंडी घालतात. अशाच एका शहाळ्यातील पाण्यात डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याप्रमाणे अनेक जण शॉक झाले आहेत. आपण नारळपाणी प्यायल्यानंतर जे शहाळं रिकामं म्हणून फेकून देतो, त्यात असं काही असेल याचा आपण विचारही केला नव्हता. अशी कमेंट या व्हिडीओवर येत आहे. दरवाजावर पाण्याने भरलेली पिशवी नक्की लटकवा, दूर होईल मोठा त्रास; कोणता ते पाहा VIDEO हर्बेश्वरी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. डॉ. पूर्वी भट यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आता यापुढे तुम्ही काय करणार, या नारळाच्या शहाळ्याची विल्हेवाट कशी लावता येईल ते तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.