नवी दिल्ली, 10 जानेवारी: देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने अंथरुणाला खिळलेल्या आपल्या तरुण मुलाला भयंकर मृत्यू (Father killed paralyzed son) दिला आहे. आरोपीनं दारूच्या नशेत दिव्यांग मुलाला काठीने बेदम मारहाण (beat with wooden stick) केली आहे. ही मारहाण इतकी भयावह होती की, यामध्ये संबंधित तरुण रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल केलं असता, त्याची प्राणज्योत मालवली आहे. हत्येची ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक (Accused father arrested) केली असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
परमजीत असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. गेल्या चौदा वर्षांपासून त्याला अर्धांगवायूचा (पॅरालिसीस) आजार आहे. त्यामुळे तो गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणालाच खिळलेला आहे. अशात परमजीतच्या वडिलांनी 8 जानेवारी रोजी रात्री दारू पिऊन घरी येत, परमजीतला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. यावेळी मृत परमजीत याची बहीण देखील घरी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी बहीण घरी आली असता, तिला परमजीत रक्ताळलेल्या आणि जखमी अवस्थेत दिसला.
हेही वाचा-वडिलांना लावला लाखोंचा चुना, लेकीने शेजाऱ्यांच्या मदतीने बँक खातं केलं रिकामं
यानंतर तिने 9 जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास भावाला भारत नगर येथील दीप चंद बंधू रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी परमजीत याची प्राथमिक तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परमजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीजेआरएम रुग्णालयात पाठवला.
हेही वाचा-थरारक! मध्यरात्री रंगला खुनी खेळ; कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीला केलं रक्तबंबाळ मग
यानंतर पोलिसांनी परमजीतच्या बहिणीच्या जबाबाच्या आधारे दिल्लीतील भारत नगर पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरुद्ध आयपीसी कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास भारत नगर पोलीस करत आहेत. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.