मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बाथरूम सिंक पॉट घेऊन एलॉन मस्क पोहचले ट्विटरच्या मुख्यालयात! जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बाथरूम सिंक पॉट घेऊन एलॉन मस्क पोहचले ट्विटरच्या मुख्यालयात! जाणून घ्या काय आहे प्रकरण?

एलोन मस्क

एलोन मस्क

ट्विटरच्या डीलमध्ये ट्विस्ट आला आणि एलॉन मस्क यांनी पर्चेसिंग डील तात्पुरती होल्डवर ठेवली होती. आता ही डील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मस्क गेल्या काही दिवसांपासून ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या खरेदीमुळे प्रचंड चर्चेत आहेत. मात्र, ट्विटरच्या डीलमध्ये ट्विस्ट आला आणि एलॉन मस्क यांनी पर्चेसिंग डील तात्पुरती होल्डवर ठेवली होती. आता ही डील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ट्विटरसोबतच्या करारावर निर्णय घेण्याच्या एक दिवस आधीच एलॉन मस्क अचानक ट्विटर मुख्यालयात पोहोचले. विशेष म्हणजे मस्क आपल्या हातात एक बाथरूम सिंक पॉट घेऊन गेले होते. 26 ऑक्टोबर रोजी मस्क यांनी आपला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील ट्विटर मुख्यालयात हातात सिंक पॉट म्हणजे बेसिनचं भांडं घेऊन प्रवेश करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ बघून, मस्क आता ट्विटर विकत घेण्याचा करार पुढे नेतील, अशी अटकळ बांधणं सुरू झालं आहे.

मस्क यांना आज (27 ऑक्टोबर) ट्विटर खरेदीच्या करारावर निर्णय घ्यायचा आहे. जर त्यांनी करारासाठी सहमती दर्शवली नाही, तर त्यांना कोर्ट ट्रायलचा सामना करावा लागेल. ट्विटरने एलॉन मस्क मुख्यालयात आल्याच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मात्र, मस्क यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ते हातात सिंक धरून ट्विटरच्या कार्यालयात प्रवेश करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा -  सिंगल चार्जमध्ये तब्बल 500 किमी धावेल OLAची पहिली Electric Car, पाहा पहिली झलक

काय म्हणाले एलॉन मस्‍क

ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर, एलॉन मस्क यांनी ट्विट केलं, की "आज या कार्यालयात खूप छान लोकांची भेट झाली. या शिवाय, हातात सिंक घेऊन तो ट्विटरच्या मुख्यालयात पोहोचल्याचाही एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे. 'लेट दॅट सिंक इन!' अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिली आहे. या व्हिडिओ पोस्ट करण्याच्या तासभर अगोदर त्यांनी 'चीफ ट्विट' टेक्स ट्विट केलं होतं. आपण कंपनीचे टॉप एक्झिक्युटिव्ह असल्याचं त्यातून त्यांना दाखवायचं होतं, अशी चर्चा आहे. त्यांच्या विविध ट्विटवरून मस्क यांनी आता ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय पक्का केल्याचं दिसत आहे.

बँकांनी निधी पाठवण्यास केली सुरुवात

या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्याने वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बँकांनी हा करार पूर्ण करण्यासाठी एलॉन मस्कना 13 अब्ज डॉलर्सचा निधी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस ट्विटर खरेदीचा करार पूर्ण होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. करारातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी 28 ऑक्टोबर अंतिम मुदत आहे. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ही मुदत वाढवता येऊ शकते.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान, मस्क यांना जुन्या ऑफरवरच डील क्लोज करण्याचा पर्याय दिला गेला आहे. ही ऑफर 44 अब्ज डॉलर्सची आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि इतर खरेदीदारांना हा करार 28 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यास सांगितलं आहे.

कागपत्रांची पूर्तता

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, मस्क यांच्या वकिलाने सेक्वॉइया कॅपिटल, बायनन्स, कतार इन्‍व्हेस्‍टमेंट अ‍ॅथॉरिटी आणि मस्कसोबत ट्विटरच्या व्यवहारात सहभागी असलेल्या इतर इक्विटी गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक कागदपत्रंदेखील दिली आहेत. गेल्या सहा महिन्यांत या करारात अनेक बदल झाले. प्रथम ट्विटरने मस्क यांची ऑफर नाकारली. नंतर ती स्वीकारली. मग, मस्क यांनी ट्विटरवर अनेक स्पॅम अकाउंट्स असल्याचा आरोप करत करार रद्द केला. यामुळे ट्विटरने न्यायालयात खटला दाखल केला होता. तूर्तास या प्रकरणाचा शेवट होईल अशी चिन्हं दिसत आहेत.

First published:

Tags: Elon musk, Twiter